Ketaki Chitale: केतकीला मानसिक उपचाराची गरज, सरकारने जबाबदारी घ्यावी; वक्फ बोर्डावरील पोस्टनंतर सांगलीत अजित पवार गट आक्रमक

Idris Naikwadi Criticized Actress Ketaki Chitale: केतकी चितळेवर मानसिक तज्ञांकडून उपचाराची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केली आहे. त्यांनी सरकारने त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करावी, असं म्हटलं आहे.
केतकी चितळे
Ketaki ChitaleSaam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे. सरकारने त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करावी, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केली आहे. केतकी चितळे यांच्याकडून वक्फ बोर्डाला देण्यात आलेल्या शासनाच्या निधीवरून जोरदार टीका करण्यात आली आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. आता राज्य सरकारने 'वक्फ बोर्डा'ला १० कोटींचा निधी जाहीर केला आहे. यावरून केतकीने सरकारवर टीका केली (Idris Naikwadi Criticized Actress Ketaki Chitale) आहे. यावेळी राज्य सरकारमधील ३ प्रमुख नेत्यांना लक्ष्य करत केतकीने संताप व्यक्त केला होता. तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती. यावरून आता अजित पवार गट आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

याला प्रत्युत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी केतकी चितळेंवर (Ketaki Chitale) टीका करताना म्हटलंय की, केतकी चितळेकडून हिंदू मुस्लिम जातीभेद करून विष पेरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, त्याचबरोबर मानसकि आणि बौद्धिकदृष्ट्या कमकुवत (Waqf Board Decision Mahayuti Sarkar) आहे. त्यांच्यावर मानसिक उपचाराची गरज आहे.

केतकी चितळे
Ketaki Chitale Controversy: केतकी चितळेचं ॲट्रॉसिटी ॲक्टविषयी वादग्रस्त वक्तव्य; वंचितने केला गुन्हा दाखल; म्हणाली होती...

राज्य सरकारने कितकी चितळे यांच्यावरील मानसिक उपचाराची जवाबदारी घ्यावी, अशी मागणी आता अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. केतकी चितळे यांनी अल्पसंख्याक समाजाला डीवचण्याचा धंदा करू नये, तो त्यांना परवडणार नाही, असा इशारा देखील नायकवडी (Ajit Pawar) यांनी दिला आहे. केतकी चितळेने महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेवरून अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी यांनी निशाणा साधला आहे.

केतकी चितळे
Ketaki Chitale News: केतकी चितळेला 'ते' वक्तव्य भोवणार? बीडपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com