Ketaki Chitale News: केतकी चितळेला 'ते' वक्तव्य भोवणार? बीडपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही गुन्हा

Ketaki Chitale: बीडच्या परळी येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर बीडपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.
Ketaki Chitale
Ketaki Chitale Saam Tv
Published On

Ketaki Chitale News

बीडच्या परळी येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे चांगलीच अडचणीत सापडली आहे. केतकीवर बीडपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अगदी दोन दिवसांपूर्वी केतकीने बीडच्या परळीमधील कार्यक्रमात एका विशिष्ट समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. (Latest News)

Ketaki Chitale
Rihanna Poses With Paparazzi: “हॉलिवूडची असली तरीही ‘डाऊन टू अर्थ’ आहे...”; रिहानाच्या एका कृतीने भारतीय चाहते भारावले

ब्राह्मण ऐक्य परिषदेतील तिच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामुळे केतकीवर टीकेची झोड उठली होती. वादग्रस्त विधान करून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केतकीवर करण्यात येत आहे. तसेच तिच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणीही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

याबाबत बीडच्या परळी पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी केतकी चितळेसह ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक असणारे तथा परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. (Marathi Actress)

Ketaki Chitale
Siddharth Jadhav Post: ‘२४ वर्षाच्या छोट्याशा कारकीर्दीत पहिल्यांदाच घडतंय...’, ‘लग्न कल्लोळ’ची क्रेझ पाहून सिद्धार्थ जाधव भारावला

आता बीडनंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांतही केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दिली होती. दरम्यान, दोन ठिकाणी गुन्हा झाल्याने केतकी चितळेचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

दरम्यान, यापूर्वी देखील २०२२ मध्ये केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी तिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. तब्बल ४१ दिवसांनंतर तिची जामीनावर सुटका झाली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (Entertainment News)

Ketaki Chitale
Laapataa Ladies Twitter Review: किरण रावच्या 'लापता लेडीज'वर प्रेक्षक फिदा, सोशल मीडिया पोस्टद्वारे केलं कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com