Shaitaan New Song: अजय देवगणच्या शैतानमधील दुसरं गाणं आऊट, 'ऐसा मैं शैतान' पाहून घाबरले चाहते

Aisa Mai Shaitaan Released: सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर आर माधवन शैतानाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
Aisa Mai Shaitaan Released
Aisa Mai Shaitaan ReleasedSaam Tv
Published On

Aisa Mai Shaitaan Song Out:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhvan) स्टारर 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) येत्या 8 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबबत दोघांचे देखील चाहते खूपच उत्सुक आहेत. निर्मात्यांनी आतापर्यंत या चित्रपटातील कलाकारांचे खरतरनाक लूक, पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि पहिलं गाणं रिलीज केलं होतं. आज निर्मात्यांनी या चित्रपटातील दुसरं गाणं 'ऐसा मैं शैतान' (aisa mai shaitaan Song) रिलीज केले आहे.

अजय देवगणनेही सोशल मीडियावर या गाण्याची घोषणा केली. चित्रपटाची कथा जादूटोणा आणि वशिकरणावर आधारित आहे. सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. तर आर माधवन शैतानाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगण आपल्या कुटुंबाला काळ्या जादूपासून वाचवताना दिसणार आहे.

'ऐसा मैं शैतान' या गाण्याची सुरुवात वूडू डॉल्स आणि आर माधवनच्या खतरनाक लूकने होते. त्यानंतर चित्रपटाची काही झलक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये अजय देवगण आपल्या मुलीवर केलेल्या वशिकरणामुळे त्रस्त दिसत आहे. मुलगी गॅस सिलेंडरवर बसून माचिसच्या काडीने आग लावताना दिसत आहे. हे गाणे 'शैतान' आणि त्याच्या शक्तींबद्दल सांगते. 'ना तंत्र ना मंत्र.. सबसे बलवान शैतान.. काली रातों का काला साया...' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं कुमारने लिहिले आहे. या गाण्याला रफ्तारने आवाज दिला आहे. अमित त्रिवेदीने दमदार बीट्ससह हे गाणं संगीतबद्ध केले आहे.

जेव्हापासून निर्मात्यांनी 'शैतान'मधील 'ऐसा में शैतान' हे गाणे रिलीज केले आहे तेव्हापासून हे गाणं युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. तसंच अजय आणि आर माधवनचे चाहतेही त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'रफ्तारच्या आवाजात जादू आहे.' तर आणखी एकाने अजय देवगणची स्तुती करताना लिहिले की, 'अजय देवगणचे चित्रपट नेहमीच धक्कादायक असतात.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल.'

Aisa Mai Shaitaan Released
Yodha Trailer: 'मैं रहूं या ना रहूं देश हमेशा रहेगा', सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'चा धमाकेदार ट्रेलर आऊट

'शैतान' हा गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वश' या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची कथा चांगल्या आणि वाईट यांच्यातील लढाईवर आधारित आहे. शैतान चित्रपट थ्रिलर, सस्पेंस आणि काळीजादूवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणसोबत साऊथची अभिनेत्री ज्योतिका (Jyothika) मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विकास बहलने 'शैतान' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Aisa Mai Shaitaan Released
The Indrani Mukerjea Story च्या रिलीजचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com