बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सध्या त्यांच्या आगामी 'योद्धा' चित्रपटामुळे (Yodha Movie) चर्चेत आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यानंतर आता ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे २९ फेब्रुवारीला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या धमाकेदार ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिद्धार्थ मल्होत्राची अॅक्शन आणि डायलॉग चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
योद्धा चित्रपटाचा ट्रेलर 2.49 मिनिटांचा आहे. जो जबरदस्त ॲक्शनने सुरू होतो आणि ॲक्शननेच संपतो. ट्रेलरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिद्धार्थ मल्होत्रा शत्रूंशी लढताना दिसत आहे. सिद्धार्थ त्याच्या टीमसोबत एका मिशनवर आहे आणि नंतर मिशन बिघडल्यावर त्याला टीममधून काढून टाकले जाते. त्याचवेळी विमान हायजॅक झाल्याची बातमी येते, जिथे सिद्धार्थ हा आर्मी मॅन नसून एक योद्धा दाखवण्यात आला आहे. तो या विमानातील नागरिकांना वाचवण्यासाठी जातो आणि विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून विमानात उपस्थित प्रत्येकाचे प्राण वाचवतो.
योद्धा चित्रपट सुरूवातीला 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार होता आणि निर्मात्यांनी रिलीजची तारीख जुलै 2023, 15 सप्टेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आणि नंतर 8 डिसेंबर 2023 केली होती. आता हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टीसोबत 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. रोहित शेट्टी दिग्दर्शित ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे.
करण जोहरच्या 'योद्धा' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, योधा फिल्म धर्मा प्रोडक्शनची पहिली एरियल ॲक्शन फ्रँचायझी आहे. राशी खन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, राशी लवकरच 'योद्धा' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राशी 'द साबरमती रिपोर्ट' आणि 'टीएमई'मध्ये विक्रांत मैस्सीसोबत दिसणार आहे. यासोबतच शाहिद कपूरच्या 'फर्जी 2' चित्रपटामध्ये ती पुन्हा एकदा दिसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.