The Indrani Mukerjea Story च्या रिलीजचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळली

The Indrani Mukerjea Story Webseries: या वेबसीरिजविरोधात सीबीआयने हाय कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या वेबसीरिजच्या रिलीजवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. पण मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आजच्या सुनावणी दरम्यान सीबीआयची ही याचिका फेटाळून लावली.
The Indrani Mukerjea Story
The Indrani Mukerjea StorySaam TV
Published On

Netflix Documentary:

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणावरील (Sheena Bora Murder Case) वेबसीरिज 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी' (The Indrani Mukerjea Story) रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वेबसीरिजविरोधात सीबीआयने हाय कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या वेबसीरिजच्या रिलीजवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. पण मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आजच्या सुनावणी दरम्यान सीबीआयची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे नेटफ्लिक्सला दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'च्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर मुंबई हायकोर्टाने वेबसीरिजच्या रिलीजला हिरवा कंदील दिला आहे. हायकोर्टाने सीबीआयने केलीली याचिका फेटाळली. हायकोर्टाच्या आदेशानंतर न्यायमूर्ती, वकील आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना वेबसीरीज दाखवण्यात आली होती. वेबसीरिजमध्ये इंद्राणी मुखर्जीसह तिच्या मुलांनी भाग घेतल्याचं सांगत आणि खटल्याचा निकाल लागेपर्यंत ही वेबसीरिजची स्ट्रिमिंग थांबवण्याची सीबीआयने मागणी केली होती. पण आज हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळून लावत या वेबसीरिजच्या रिलीजचा मार्ग मोकळा केला आहे.

मागच्या सुनावणीदरम्यान, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग करा असे आदेश नेटफ्लिक्सला दिले होते. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. या वेबीसीरिजमुळे या प्रकरणाच्या खटल्यावर परिणाम होऊ शकतो असे सीबीआयकडून सांगण्यात आले होते. या वेबसीरिजचे स्पेशल स्क्रिनिंग झाल्यानंतर २९ फेब्रुवारीला म्हणजे आज याप्रकरणावर सुनावणी सुनावणी झाली.

The Indrani Mukerjea Story
Yodha Trailer: 'मैं रहूं या ना रहूं देश हमेशा रहेगा', सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'चा धमाकेदार ट्रेलर आऊट

सीबीयाचे असे म्हणणे होते की, ही वेबसीरिज प्रदर्शित झाली तर त्याचा उर्वरित साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी नेटफ्लिक्सच्या वकिलाने सांगितले होते की, 'ही वेबसीरिज नसून डॉक्युमेंटरी आहे. सामग्री केवळ साक्षीच्या आधारावर दर्शविली गेली आहे.' पण आता या वेबसीरिजच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर ही वेबसीरिज रिलीज करण्यास हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.

The Indrani Mukerjea Story
Hee Anokhi Gaath Movie: श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, 'ही अनोखी गाठ'च्या एका तिकीटावर मिळवा एक फ्री

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com