Ketaki Chitale Controversy: केतकी चितळेचं ॲट्रॉसिटी ॲक्टविषयी वादग्रस्त वक्तव्य; वंचितने केला गुन्हा दाखल; म्हणाली होती...

Ketaki Chitale VS Atrocities Act Controvery: केतकी चितळेसह ब्राम्हण ऐक्य परिषदेचे आयोजक असणारे तथा परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्याविरोधात आंबेडकरी समाजासह मराठा समाजाने परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.
Atrocities Act Controversial Statement Case Registered In Parli Police Station Against Ketaki Chitale  And Former City President Bajirao Dharmadhikari | Saam Tv News Marathi
Atrocities Act Controversial Statement Case Registered In Parli Police Station Against Ketaki Chitale And Former City President Bajirao Dharmadhikari | Saam Tv News MarathiSaam Tv
Published On

Ketaki Chitale Controversial Statement Over Atrocities Act :

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे केतकीला चांगलंच भोवलं आहे. केतकीच्या विधानानंतर आंबेडकरी चळवळ आक्रमक झालीय. आज केतकी चितळेसह माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.(Latest News)

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) शहर अध्यक्ष प्रेमनाथ जगतकर यांच्या फिर्यादीवरून,परळी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 295-A ,505(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलंय. ॲट्रॉसिटी दाखल करणारे एक रॅकेट सक्रिय असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केतकी चितळे (Ketaki Chitale) यांनी परळी येथील ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये केलं होतं. यामुळे आंबेडकरी चळवळ चांगलीच आक्रमक झाली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Atrocities Act Controversial Statement Case Registered In Parli Police Station Against Ketaki Chitale  And Former City President Bajirao Dharmadhikari | Saam Tv News Marathi
Ketaki Chitale: ‘आता कसे, खरे रूप दिसले...’, मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

केतकी चितळेसह ब्राम्हण ऐक्य परिषदेचे आयोजक असणारे तथा परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात आंबेडकरी समाजासह मराठा समाजाने (Maratha Community) परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. अखेर आज केतकी चितळेसह माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. तिच्या या वादग्रस्त विधानामुळे तिला अनेकवेळा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

केतकीने दलित समाजाबरोबरच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली जात होती. दरम्यान केतकीच्या भाषणाचा व्हिडिओ या व्हायरल झाला होता. काही लोक ॲट्रॉसिटी ॲक्टचे रॅकेट चालवत असून याबाबत आरटीआय टाका आणि गेल्या ५ वर्षांची माहिती मिळवा, असे आवाहन तिने ब्राह्मण ऐक्य परिषदेत केलं होतं.

Atrocities Act Controversial Statement Case Registered In Parli Police Station Against Ketaki Chitale  And Former City President Bajirao Dharmadhikari | Saam Tv News Marathi
Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding: अंबानी कुटुंबीयांनी ५१ हजार नागरिकांना स्वत:च्या हाताने वाढलं जेवण, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com