नाशिक TCS प्रकरणाचं मुब्रा कनेक्शन; निदा खानचं २ महिने ठाण्यात होतं वास्तव्य, पती मोईन खान पोलिसांच्या ताब्यात

Nashik Corporate Harassment Case: नाशिक टीसीएस प्रकरणात मोठे वळण आले आहे. आरोपी निदा खानचे मुंब्रा कनेक्शन उघडकीस आले आहे. पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असून तपास तीव्र केला आहे.
Nashik Corporate Harassment Case:
Police investigation intensifies in Nashik TCS case as Mumbra link of accused emergessaam tv
Published On
Summary
  • नाशिक TCS प्रकरणात मुंब्रा कनेक्शन उघड

  • आरोपी निदा खान दोन महिन्यांपासून ठाण्यात राहत होती

  • तिचा पती मोईन खान पोलिसांच्या ताब्यात

नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणात नवा मोठा खुलासा झाला आहे. टीसीएस कंपनीमधील एचआर म्हणून काम करणारी निदा खानचं मुब्रा कनेक्शन समोर आले आहे. निदा खान दोन महिन्या ठाण्यात राहत होती, अशी समोर आली आहे. यासह आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट आखला जात होता. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग केले असून त्यातून धर्मांतराचा सर्व चिठ्ठा समोर येणार आहे.

Nashik Corporate Harassment Case:
लव्ह जिहादची स्पर्धा, मित्रानेच फोडलं बिंग, अमरावतीतील लैंगिक शोषणात विकृतीची परिसीमा

कॉर्पोरेट लैंगिक छळवणूक प्रकरणातील आरोपी निदा खान दोन महिन्यांपासून ठाण्यातील मुंब्रा भागात वास्तव्याला होत, अशी माहिती पोलिसांना मिळाला आहे. तिचा पती मोईन खान (२७) याची शुक्रवारी नाशिक गुन्हे शाखेने मुंब्रा पोलीस ठाण्यात चौकशी केली गेली. मोईन याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nashik Corporate Harassment Case:
TCS मधील धर्मांतराचं टेरर कनेक्शन? नाशिकमधील धर्मांतराला परेशातून मदत?

कॉर्पोरेट लैंगिक छळवणूक प्रकरणात नाशिकच्या कंपनीतील कर्मचारी महिला आणि आरोपी निदा हिच्याविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. निदाचं माहेरकडील नाव निदा एजाज खान तर सासरचे नाव निदा मोईन नविद खान (वय २६) असे आहे. सध्या निदा खान फरार असल्याने तिच्या चौकशीसाठी मुंब्रा भागात राहणारा तिचा पती मोईनला ताब्यात घेत नाशिक गुन्हे शाखेने चौकशी केली.

दरम्यान फरार आरोपी निदा खानच्या शोधासाठी पोलिसांनी SIT ची ३ पथकं मागावर आहेत. निदाचा मोबाईल बंद असल्यानं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे. दरम्यान निदा खान मूळची अशोकामार्ग नाशिक येथील ती रहिवासी आहे, ती टीसीएस कंपनीत कामाला होती. तर तिचा पती मोईन हा मुंब्रा येथील एका कंपनीत लॉजिस्टिक ऑफिसर म्हणून काम करतो.

तो फेब्रुवारी महिन्यात अमृतनगर, मुंब्रा येथे भाड्याने घर घेऊन राहत होता. त्यानंतर त्याची पत्नी निदा हिने मुंबईला बदली केली होती, त्यानंतर ती त्याच्यासोबत मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. ९ एप्रिल २०२६ रोजी कामावरून तिला कमी केल्याची नोटीस आली. त्यानंतर तिची मावशी नुरी शेख तिला दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे घेऊन गेल्याचे चौकशीत पती मोईन याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com