नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लव्ह जिहाद प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.. त्यातच आता या प्रकरणाचं थेट टेरर कनेक्शन असल्याचा संशय बळावलाय...कारण टीसीएसची एचआर निदा खानचं दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी डॉ. शाहीन शाहीदशी कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.. त्यामुळेच या प्रकरणात आता थेट एनआयएची एण्ट्री झालीय... त्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत...
खरं तर टीसीएसमधील लव्ह जिहाद प्रकरणात आतापर्यंत नऊ महिला कर्मचाऱ्यांनी सहा आरोपींविरोधात लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतराची तक्रार केलीय...एवढंच नाही तर या धर्मांतरासाठी आणि तरुणींना जाळ्यात ओढण्यामागे थेट कंपनीची एचआर निदा खान हिच असल्याचं समोर आलंय.. निदा खान नोकरीसाठी आलेल्या तरुणींचं ब्रेन वॉश करायची...
इस्लामी प्रथा आणि धार्मिक आचरणाला प्रवृत्त करायची..... विशेष म्हणजे पीडित तरुणींना त्र्यंबकेश्वरच्या रिसॉर्टवर नेऊन पार्ट्या केल्या जायच्या आणि त्यांना जाळ्यात ओढलं जायचं... त्यानंतर याच मुलींना थेट मलेशियाला पाठवलं जायचं...अशी ही लव्ह जिहादची मोडस ऑपरेंडीच असल्याचं समोर आलंय.. मात्र या प्रकरणात आता एनआयएनं एण्ट्री आर्थिक कनेक्शन तपासण्यास सुरुवात केलीय...
एनआयएकडून निदा खानच्या आर्थिक स्त्रोतांचा तपास केला जातोय.. निदा खानच्या बँक खात्यांचाही तपास केला जातोय.. एवढंच नाही तर तिला पगाराव्यतिरिक्त आणखी कोणत्या मार्गानं पैसा मिळत होता, त्याचीही तपासणी केली जाणार आहे... याबरोबरच बंदी घातलेल्या किती स्लीपर सेल संघटनांसोबत निदाचा संबंध आहे... याचा डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण करुन तपास केला जाणार आहे.. आता नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लव्ह जिहाद प्रकरणात महाराष्ट्र एटीएसही अॅक्शन मोडवर आलीय.. एटीएसनं निदा खानचा शोध घेण्यासाठी ठाणे, मुंब्रा आणि भिवंडी परिसरात छापेमारी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... आता एनआयएनं या निदा खानच्या मुसक्या आवळण्यासोबतच धर्मांतराच्या रॅकेटची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.