नाशिक TCS प्रकरणात मोठा खुलासा
निदा खान गरोदर असल्याचा दावा
पती पोलिसांच्या ताब्यात
मुख्य आरोपी अद्याप फरार
ATS आणि पोलिसांकडून तपास सुरू
Nashik TCS HR Nida Khan Pregnant News नाशिकमधील बहुप्रतिष्ठित कंपनी असलेल्या TCS मध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातून मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात मास्टर माईंड मानल्या जाणाऱ्या HR निदा खान हीच्या कुटुंबीयांनी मोठा खुलासा केला आहे. निदा खान ही गरोदर असून ती मुंबईत असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. दरम्यान तिच्या पतीला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले असून निदा खान अद्याप फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत असून या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या TCS कंपनीत कर्मचाऱ्यांचे जबरदस्ती लैंगिक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एका तरुणाचे धर्मांतर करत असल्याचे पाहायला मिळाले. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आरोप केले आहे की, त्यांना जबरदस्तीने बीफ खाऊ घातले जायचे आणि नमाज पठण करायला लावून हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलण्यास भाग पडायचे.
तसेच या प्रकरणात TCS कंपनीची HR निदा खान हीच मोठा हात असून ती या प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात आता पर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान निदा खान ही अद्याप फरार आहे. नाशिक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमच्या माहितीनुसार, निदा खान गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या पतीसोबत मुंब्रा येथे राहत होती. त्याआधी ती नाशिकमध्ये होती आणि त्यापूर्वी भिवंडी येथे वास्तव्यास होती. नाशिक पोलिसांनी निदाच्या पतीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
निदा ही HR नसून टेलीकॉलर असल्याचे उघडकीस आले आहे. तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ती गरोदर असून मुंबईतच आहे. निदाने नाशिकमधील स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तिने आपल्या अर्जात वैद्यकीय कारण देऊन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून नमूद केले आहे. दरम्यान आता निदा खान स्वतःहून समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याप्रकरणी पोलीस आणि ATS सखोल तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.