साडीच्या झोपाळ्यामुळे ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
खेळताना साडी गळ्यात अडकून श्वास गुदमरला
रुग्णालयात दाखल करताच मुलाला मृत घोषित
घरगुती सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर
लहानमुलांना झोपाळ्यावर खेळण्यात वेगळाच आनंद मिळतो. मुलांच्या हट्टासाठी पालक त्यांना गार्डनमध्ये घेऊन जातात. मात्र गावाकडे पूर्वीपासून लाकडी झुल्यासोबत आईच्या साडीचा झुला केला जायचा. आईच्या साडीपासून बनवलेल्या झुल्यात एक वेगळीच ऊब आणि आनंद मिळायचा. अलीकडे हा प्रकार शहरात फार कमी पाहायला मिळतो. याचं साडीच्या झोपाळ्याने एका ८ वर्षाच्या मुलाचं हसतं - खेळतं आयुष्य हिरावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील मांड्यामध्ये साडीच्या झोपाळ्यावर खेळत असताना ८ वर्षाच्या मुलाला साडीचा फास लागून त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने हंबरडा फोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टणमच्या कारेकूर गावात घडली आहे. विजय कुमार हे या गावात आपल्या कुटुंबासोबत राहतात. विजय कुमार हे सकाळच्या सुमारास कामावर गेले असता, घरात त्यांची पत्नी आणि ८ वर्षांचा मुलगा होता. कुमार यांच्या मुलाला झोपाळ्यावर खेळायला फार आवडायचं. त्याच्या हट्टासाठी कुमार यांच्या पत्नीने स्वतःच्या साडीचा झोपाळा तयार केला.
या झोपाळ्यात खेळताना साडी गोल फिरून कुमार यांच्या ८ वर्षांच्या मुलाच्या गळ्याला फास बसला. यावेळेस त्याची आई स्वयंपाक घरात काम करत होती. गळ्याला फास बसल्याने कुमार यांच्या मुलाला श्वास घेणं कठीण झालं. त्यामुळे तो ओरडू देखील शकला नाही. थोड्या वेळाने मुलाचा काही आवाज आला नाही म्हणून पीडित मुलाची आई त्याला बघण्यासाठी स्वयंपाक घरातून बाहेर आली असता मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला.
मुलाची अवस्था पाहून कुमार यांची पत्नी जागीच कोसळली. तिच्या आरडाओरड्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. मुलाची गंभीर प्रकृती पाहून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूने कुमार यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. या घटनेने कुमार यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.