

नाशिकमध्ये निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात ही घटना घडली. राहत्या घरी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने आत्महत्या का केली? यामागचे कारण समजू शकले नाही. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत गोविंद हेमाडे असं या आत्महत्या केलेल्या निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याचे नाव होते. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं. गोळीबाराच्या आवाजाने शेजारच्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी हेमंत हेमाडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेमाडे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हेमंत हेमाडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हेमंत हमाडे यांच्या घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? यामागचे खरं कारण समोर आले नाही.
हेमंत हेमाडे यांनी कौटुंबीक कारणावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिस सध्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा जबाब नोंदवून घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.