Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर हल्ल्याचा कट! पोलिसांनी दोघांना केली अटक; बिग बींची गूढ पोस्ट चर्चेत

Amitabh Bachchan Cryptic Post : अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेनंतर बिग बींची 'बच गये' पोस्ट चर्चेत आली आहे.
Amitabh Bachchan Cryptic Post
Amitabh BachchanSAAM TV
Published On: 
Summary

अमिताभ बच्चन यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्लान

'बच गये' म्हणत अमिताभ बच्चन यांची सूचक पोस्ट

जलसा बंगल्यावर हल्ल्याचा कट रचणाऱ्या दोघांना अटक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची सुरक्षितता आणखी कडक करण्यात आली आहे. मुंबईतील त्यांच्या 'जलसा' बंगल्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली 'बच गये' ही सूचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

अमिताभ बच्चन यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलेल्या दोन शब्दांच्या क्रिप्टिक पोस्टमुळे (Cryptic post) चाहत्यांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत. अनेकजण 'बच गये' (वाचलो/वाचले) या हिंदी वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय असावा, यावर चर्चा करत आहेत.पीटीआय नुसार, अनेक वापरकर्त्यांनी अभिनेत्याला या शब्दांमागचा संदर्भ स्पष्ट करण्याची विनंती केली आहे. या पोस्टवर मोठ्या संख्येने कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

काही जणांनी बच्चन यांच्या या पोस्टचा संबंध परदेशातून कार्यरत असलेल्या एका गँगस्टरशी संबंधित दोन कथित शार्पशूटरच्या अटकेशी जोडला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार, यातील एका आरोपीला मुंबईत मुक्काम वाढवून एका बड्या बॉलिवूड अभिनेत्याच्या जो नंतर अमिताभ बच्चन असल्याचे समोर आले, घराबाहेर गोळीबार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Amitabh Bachchan Cryptic Post
Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने दिल्ली आणि मुंबईत स्वतंत्र मोहिमा राबवून त्यांना अटक केली.दरम्यान, गँगस्टर गोल्डी ढिल्लन याने अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे.सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ढिल्लनने इशारा दिला की, 'बुलेटप्रूफ केबिन' (सुरक्षा कवच) या पिता-पुत्राला वाचवू शकणार नाहीत. त्याने असा दावाही केला की, त्याच्या टोळीचे काही लोक मुंबईत तैनात आहेत. दोन कथित शूटर्सच्या अटकेनंतर ही धमकी देण्यात आली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांना एक ईमेल मिळाला होता, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), महालक्ष्मी रेसकोर्स आणि बच्चन यांचे निवासस्थान 'जलसा' येथे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, नंतर ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याआधी २३ ऑक्टोबर रोजीही पोलिसांना असाच एक ईमेल मिळाला होता.

१ नोव्हेंबर रोजी चाहत्यांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन 'बुलेटप्रूफ काचेच्या' मागे दिसले होते, परंतु त्यानंतरच्या भेटींमध्ये त्यांनी याचा वापर केला नाही. अलिकडच्या काही महिन्यांत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळाल्या आहेत.१८ ऑक्टोबर रोजी दोन शूटर्सनी जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर पाच राऊंड गोळीबार केला होता. या घटनेत अभिनेता सुदैवाने बचावला, मात्र त्याचा चालक जखमी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.