Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट; आरोपीचं थेट बिष्णोई गँगसोबत कनेक्शन

Amitabh Bachchan House Firing Case: अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराचा कट रचल्याप्रकरणी विकास ठाकूरला अटक करण्यात आले आहे. या विकास ठाकूरचा बिष्णोई गँगशी संबंध असल्याचे माहितीही तपासात समोर आली आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanSaam Tv
Published On: 

Amitabh Bachchan House Firing Case: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट रचल्याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी विकास ठाकूर याचा थेट बिष्णोई गँगशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी विकास हा कुख्यात गँगस्टर अनमोल बिष्णोई याला शस्त्रांचा पुरवठा करत असल्याचा आरोप आहे. तसेच नवीन गुन्हेगारांची भरती करणे, अवैध शस्त्रांची व्यवस्था करणे आणि खंडणीसाठी टार्गेटची रेकी करणे, अशा जबाबदाऱ्याही तो सांभाळत असल्याचे समोर आले आहे. या खुलाशामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अनमोल बिष्णोईला करायचा शस्त्रांचा पुरवठा

मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिष्णोईच्या अटकेनंतर विकास ठाकूर हा विकास अनिल पंडित आणि रंदीप मलिक यांच्यासाठी काम करत होता. तो गुन्हेगारी टोळ्यांसाठी नवीन सदस्यांची भरती करण्यापासून ते अवैध शस्त्रांची व्यवस्था आणि पुरवठा करण्याची कामे करत होता. याशिवाय खंडणी वसूल करण्यासाठी व्यावसायिक आणि व्यक्तींची माहिती गोळा करणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि रेकी करणे, अशी कामेही त्याच्याकडे होती.

Amitabh Bachchan
Ramayana: बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या 'रामायण'ची महागर्जना! ११ व्या दिवशी कमावले ७५ कोटी, केला 'धुरंधर'चा चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक

पैशांसाठी वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम

तपासातील माहितीनुसार, विकास ठाकूर कोणत्याही एका गुन्हेगारी टोळीशी कायमस्वरूपी जोडलेला नव्हता. पैशांच्या मोबदल्यात तो वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम करत होता. याच काळात त्याचा परदेशात राहत असलेल्या एका फरार गँगस्टरशी संपर्क आला. या गँगस्टरच्या सांगण्यावरून त्याने मुंबईतील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचा आरोप आहे.

Amitabh Bachchan
Diljit Dosanjh: 'मी घाबरत नाही, कोणाच्या बापाचा हिंदुस्तान नाही' दिलजीत दोसांजचा कॉन्सर्टमध्ये धमकी देणाऱ्यांना सडेतोड इशारा!

अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी

परदेशात राहत असलेल्या फरार गँगस्टरच्या सांगण्यावरून विकास ठाकूरने मुंबईत एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे. या कटामागे नेमका कोणाचा हात होता आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची योजना आखण्यात आली होती, याचा तपास यंत्रणा करत आहेत.

दिल्लीतील व्यावसायिकालाही बनवले होते लक्ष्य

केवळ मुंबईतच नव्हे, तर दिल्लीमध्येही एका स्थानिक व्यावसायिकाला लक्ष्य करण्याची जबाबदारी विकास ठाकूरने घेतली होती. संबंधित व्यावसायिकाकडून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर गोळीबार करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे विकास ठाकूरचा गुन्हेगारी कारवायांमधील सहभाग अधिक व्यापक असल्याचे तपासातून समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.