Pune Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन! गोव्यातून पुण्यात आले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले

Illegal Pistol Purchase in pune : सोशल मीडियाचा वाढता विळखा आणि गुन्हेगारीचे नवे प्रकार समोर येत असून, इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून थेट पिस्तूल खरेदीचा बेकायदेशीर प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
Pune police arrest Goa residents in illegal firearm purchase case
Pune police arrest Goa residents in illegal firearm purchase casesaam tv
Published On: 

अक्षय बडवे

सोशल मीडियावर झालेली ओळख आणि त्यातून ठरलेला पिस्तूल खरेदीचा व्यवहार तरुणांना चांगलाच महागात पडला आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या गोव्यातील दोन तरुणांनी पिस्तूल खरेदी करण्यासाठी थेट पुणे गाठले.

मात्र, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच वाघोली पोलिसांनी सापळा रचून चौघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी चार देशी बनावटीची पिस्तूल, चार मॅगझीन आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख १८ हजार ५०० रुपये आहे.

Pune police arrest Goa residents in illegal firearm purchase case
Maharashtra : पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त गावांना दिलासा

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आकाश उर्फ गज्या अशोक मोरे, मनीष दिलीप फर्नांडिस आणि चंद्रेश्वर माल्लेशी यांचा समावेश आहे. तर चौथा आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी केसनंद परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ते चार जण पिस्तूल घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार पिस्तूल, चार मॅगझीन आणि १५ जिवंत काडतुसे आढळून आली.

Pune police arrest Goa residents in illegal firearm purchase case
Rain Alert : महाराष्ट्रावर ‘अक्वान’ च संकट! पुढील ४८ तासात 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आकाश मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पिस्तूल बाळगणे तसेच खरेदी-विक्रीसंदर्भातील गुन्हे दाखल आहेत. तो सोशल मीडियावर पिस्तूल हातात घेतलेले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून गोव्यातील दोन तरुण त्याच्या संपर्कात आले. त्यानंतर इंस्टाग्रामवरून ओळख वाढवत त्यांनी पिस्तूल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. एका पिस्तुलाची किंमत सुमारे ५० हजार रुपये ठरवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील तपासणी नाक्यांवर खासगी वाहने आणि बसची तपासणी होत असल्याने पोलिसांचा संशय टाळण्यासाठी या तरुणांनी दुचाकीवरून पुण्यापर्यंत प्रवास केला. पुण्यात आल्यानंतर चौघेही केसनंद परिसरात भेटले. मात्र, पिस्तूल खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्याआधीच वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

इंस्टाग्रामवरील ओळखीचा वापर करून सुरू झालेला हा बेकायदेशीर शस्त्रव्यवहार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.