Maharashtra : पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त गावांना दिलासा

Maharashtra Water Crisis News : महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! तात्पुरत्या किंवा बंद नळयोजना सुरू करण्याचे आदेश.
Maharashtra Water Crisis News
Maharashtra Water Crisis News AI image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला

  • जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना पाणीपुरवठा कामांसाठी आर्थिक मंजुरीचे वाढीव अधिकार देण्यात आले

  • ४० लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देता येणार

  • बंद पडलेल्या नळपाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जाणार

यंदा राज्यात पावसाभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून कमी पडलेल्या पावसामुळे पुढील महिन्यातील पाण्याची चिंता वाढली आहे. पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असतानाच लवकरात लवकर उपाय करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गावागावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी पाणीपुरवठ्याच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यात ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे, अशा भागांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यावर सरकारने भर दिला आहे. यामध्ये बंद पडलेल्या नळपाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करणे, नवीन तात्पुरत्या नळयोजना सुरू करणे तसेच गरजेनुसार टँकर आणि बैलगाड्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. या कामांना मंजुरी मिळण्यासाठी अनेकदा प्रशासकीय प्रक्रियेत वेळ जातो. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना वेळेवर मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने आर्थिक मंजुरीच्या अधिकारांमध्ये वाढ केली आहे.

Maharashtra Water Crisis News
UPI व्यवहाराबाबत मोठी बातमी! B2B व्यवहारासाठी द्यावे लागणार फक्त ५ रुपये शुल्क

महसूलमंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासाठी पुढाकार घेतला आहे. नव्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना ४० लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना आर्थिक मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यासंदर्भातील आर्थिक मर्यादा वाढवण्याचा अधिकृत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Water Crisis News
Moss Removal : घराच्या गच्चीवर, अंगणात आणि भिंतींवर शेवाळ साचलंय? जाणून घ्या शेवाळ काढण्याचे सोपे घरगुती उपाय

या निर्णयामुळे जिल्हा आणि विभाग स्तरावरच पाणीपुरवठ्याच्या कामांना लवकर मंजुरी मिळू शकणार आहे. परिणामी, पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यास विलंब होणार नाही, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ कमी व्हावी आणि टंचाईच्या काळात त्यांना दिलासा मिळावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.