Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात शिक्षिकेची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

Pune News: पुण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. शाळेत निघालेल्या शिक्षिकेला वाटेत अडवून तिची निर्घृण हत्या केली.
Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात शिक्षिकेची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Pune CrimeSaam Tv News
Published On: 

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील मौजे पांगारे येथे ही धक्कादायक घटना घडली. शाळेमध्ये जात असताना पाठीमागून वाहनाने धडक देत आणि नंतर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुरंदर तालुका हादरला आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच आईचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सासवड पोलिस या घटनेचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील मौजे पांगारे येथे शिक्षिकेची हत्या करण्यात आली. उज्वला रामदास काकडे (वय ४७ वर्षे) असं या शिक्षिकेचे नाव होते. त्या पांगारे येथेच राहत होत्या. हडपसर येथील साधना विद्यालयात त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे नोकरीसाठी पांगारे येथून हडपसरच्या दिशेने जात होत्या. त्याचवेळी न्यू इंग्लिश स्कूल पंगारेच्या जवळच आरोपीने मालवाहू कॅरी वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर धारदार हत्याराने त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर हल्ला केला. आरोपी ऐवढ्यावर थांबला नाही त्याने शिक्षिकेच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला.

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात शिक्षिकेची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह; वडिलांच्या कॉलमुळे धक्कादायक प्रकार उघड

या हत्येमागे आर्थिक देवाणघेवाण किंवा जमिनीच्या व्यवहारातून वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. पांगारे गावातील ग्रामस्थांमध्ये ही चर्चा सुरू आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सध्या कसून तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेमुळे उज्वला यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्याच दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. उज्वला काकडे यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे.

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात शिक्षिकेची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Pune Crime : पुण्यात एटीएम फोडून २० लाख ३० हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारून चोरट्याचा डल्ला

याबाबत सासवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले की, पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक स्रोतांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना के आली आहेत. लवकरच आरोपीला ताब्यात घेऊन या घटनेचा संपूर्ण उलगडा केला जाईल. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात शिक्षिकेची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं
Pune Crime : इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन! गोव्यातून पुण्यात आले, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.