Shreya Maskar
पुरंदर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
पुरंदर किल्ला हा छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्याने मराठ्यांचा सुवर्णकाळ पाहिला आहे. पुरंदर किल्ला ४,४७२ फूट उंचीवर वसलेला आहे.
पुरंदर किल्ल्यावर विशेषतः १६६५ मधील वेढा आणि पुरंदरचा तह यांसारख्या घटना घडल्या. पुरंदर किल्ला लष्करी गड म्हणून ओळखला जातो.
पुरंदर किल्ला हा त्याच्या जुळ्या रचनेसाठी देखील ओळखला जातो. किल्ल्यात दोन स्वतंत्र स्तर आहेत. खालची 'माची' आणि वरचा 'बालेकिल्ला'. तसेच, याच्या शेजारी 'वज्रगड' हा एक लहान जुळा किल्लाही आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनापती मिर्झा राजा जयसिंग यांच्यात १६६५ मध्ये झालेला ऐतिहासिक तह याच ठिकाणी झाला होता.
पुरंदर किल्ला मूळतः ११ व्या शतकात यादव राजवटीने संरक्षणात्मक गड म्हणून बांधला होता.
मुंबईहून पुण्याला ट्रेनने प्रवास करा. पुणे स्टेशनला उतरून तुम्ही नारायणपूर गावापर्यंत रिक्षाने प्रवास करा. तेथून पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेक करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.