Mahad Tourism : महाडजवळ कुठे फिराल? पिकनिकसाठी ‘ही’ ५ ठिकाणं ठरतील बेस्ट

Shreya Maskar

महाड

महाड हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गालगत वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे. पावसाळ्यात येथे पर्यटक आवर्जून मजा-मस्ती करायला येतात.

Mahad | google

सातसडा धबधबा

सातसडा धबधबा हा त्यांच्या सुंदर ७ टप्प्यांसाठी ओळखला जातो. येथील पाणी अत्यंत स्वच्छ आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोज क्लिक करू शकता.

Satsada Waterfall | google

कुंभे धबधबा

कुंभे गावात कुंभे धबधबा वसलेला आहे. हा धबधबा दाट हिरवाईने वेढलेला आहे. येथे धबधब्यासोबतच एक नैसर्गिक जलाशयही आहे.

Kumbhe Waterfall | google

नानेमाची धबधबा

महाड परिसरातील दाट जंगलात नानेमाची धबधबा वसलेला आहे. तु्म्ही येथे छोटा ट्रेक करून जाऊ शकता. कुटुंबासोबत फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.

Nanemachi Waterfall | google

रायगड किल्ला

रायगड किल्ला हा ऐतिहासिक डोंगरावरील किल्ला आहे. येथून पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते आणि मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास अनुभवता येतो.

Raigad Fort | google

वरंधा घाट

तुम्हाला रोड ट्रिप करायची असेल तर वरंधा घाट हा उत्तम पर्याय आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील हा एक निसर्गरम्य घाटमार्ग आहे. धुक्याने वेढलेली दृश्ये, खोल दऱ्या आणि पावसाळ्यात वाहणारे ओढे-नाले यासाठी हा घाट प्रसिद्ध आहे.

Varandha Ghat | google

कधी भेट द्यावी?

तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात महाडला भेट द्या. वीकेंडला जाणे टाळा कारण या दिवसांत पर्यटन स्थळांना गर्दी पाहायला मिळते.

When to visit? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

Churchgate Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...