Shreya Maskar
पावसाळ्यात तुम्हाला संध्याकाळी वीकेंडला फेरफटका मारायला जायचे असेल तर चर्चगेटजवळील ही ठिकाणे स्वर्गाहून सुंदर ठरतील. त्यामुळे आतच आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत ट्रिप प्लान करा.
गेटवे ऑफ इंडिया हे पावसाळ्यात संध्याकाळी फिरायला बेस्ट लोकेशन आहे. परदेशी पर्यटकही येथे येतात. फोटोशूटसाठी हे ठिकाण सुंदर आहे.
अरबी समुद्राच्या काठावर असलेला हा समुद्रकिनारा 'क्वीन्स नेकलेस' (राणीचा हार) म्हणून ओळखला जातो. संध्याकाळी सूर्यास्ताचा सुरेख नजारा पाहायला पर्यटकांची गर्दी होते.
मरीन ड्राइव्हच्या उत्तर टोकाला गिरगाव चौपाटी आहे. येथे स्ट्रीट फूड आणि सी-फूडचा आस्वाद घेता येतो. तसेच येथे वाळूत तुम्ही निवांत बसून जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.
खोताचीवाडी हे दक्षिण मुंबईत गिरगाव परिसरात वसलेले 200 वर्ष जुने वारसा गाव आहे. याला 'मिनी-गोवा' म्हणून ओळखले जाते. रंगीबेरंगी पोर्तुगीज-शैलीचे लाकडी बंगले, अरुंद वळणदार गल्ल्या येथे पाहायला मिळतात.
मलबार हिल हे एका उंच टेकडीवर वसलेले आहे. साऊथ मुंबईतील हे सर्वात सुंदर आणि हिरवेगार ठिकाण आहे. येथून मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटी बीच दिसते.
तुम्ही चर्चगेटला ट्रेनने प्रवास करून जा. पुढे टॅक्सीने तुम्ही वर दिलेल्या कोणत्याही लोकेशनवर सहज पोहचाल. वन डे ट्रिपसाठी हे खास आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.