Satara News: चिठ्ठीत गुडबाय लिहित बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, २ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा

Satara Bank Officer End Life: साताऱ्यामध्ये इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली. राहत्या घरी त्यांनी आयुष्य संपवलं. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली.
Satara News: चिठ्ठीत गुडबाय लिहित बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, २ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा
Satara Bank Officer End LifeSaam Tv
Published On: 

साताऱ्यामध्ये बँक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कराडमधील इंडियन बँकेमध्ये हा अधिकारी कार्यरत होता. चिठ्ठीमध्ये गुडबाय लिहित या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं. बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या अधिकाऱ्याने चिठ्ठीत लिहिले. या प्रकरणी बँकेतील दोन महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कराडमध्ये इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याने राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. रविकिरण केशव लाडे असे मृत अधिकाऱ्याचे नाव होते. रविकिरण हे कराड येथील इंडियन बँकेच्या शाखेत कार्यरत होते. बँकेतील पुणे उपक्षेत्रीय आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या जाचाला कंटालून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रविकिरण यांनी लिहिलेलेल्या चिठ्ठीत २ महिला अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे.

Satara News: चिठ्ठीत गुडबाय लिहित बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, २ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा
Kalyan Crime : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

रविकिरण लाडे यांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रविकिरण लाडे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील रहिवासी होते. कराड शहर पोलिस ठाण्यात रविकिरण यांच्या भावाने तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर रविकिरण यांच्या आत्महत्येप्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Satara News: चिठ्ठीत गुडबाय लिहित बँक अधिकाऱ्याची आत्महत्या, २ महिला अधिकाऱ्यांवर गुन्हा
Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.