राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

Earthquakes in Nashik and Palghar : 21 दिवसात राज्यात 50 भूकंपाचे धक्के बसलेत. भूकंपामुळे नाशिक आणि पालघरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलयं. मात्र पालघर आणि नाशिकलाच भूकंपाचे धक्के का बसतायत? भू-गर्भात नेमक्या कोणत्या हालचाली होताहेत? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.
Earthquakes in Nashik and Palgha
Published On

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून भूकंपाची मालिका सुरूच आहे.अवघ्या 21 दिवसात नाशिकमध्ये 45 भूकंपाचे धक्के बसलेत. त्यात विशेष म्हणजे एकाच दिवसात दोन ते तीन वेळा भूकंपाचे धक्के बसl असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलयं.साम टिव्हीनं नाशिकमधील सुरगाणा भागातील भूकंपानंतर झालेल्या परिस्थितीचा थेट घटनास्थळावरून आढावा घेतलाय. दरम्यान नाशिकमधील कोणत्या भागात सातत्यानं भूकंपाचे धक्के बसतायत. पाहूयात.

Earthquakes in Nashik and Palgha
महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

नाशिकच्या 'या' भागांत धक्के

पंचवटी

म्हसरुळ

आडगाव

मखमलाबाद

शिलापूर

सिद्ध पिंप्री

नांदूरशिंगोटे

चास

दिंडोरी

कळवण

पेठ

सुरगाणा

या भागामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतायत. त्यातही नाशिकमधील पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमध्ये एकाच दिवशी एकाहून अधिक धक्के बसल्यानं नाशिक जिल्ह्यात भूकंप-समूह' का निर्माण झालाय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Earthquakes in Nashik and Palgha
Nashik Earthquake: नाशिक- पालघर पुन्हा हादरलं! सुरगाणा,दिंडोरी, कळवण भागातील जमीन थरथरली, वारंवार का येतोय भूकंप?

'भूकंप-समूह' का निर्माण झालाय?

- ठराविक काळात वारंवार बसणाऱ्या धक्क्यांना समूह म्हणतात

- भूगर्भातील खडकांच्या हालचालींमुळे आणि ताणामुळे धक्के जाणवतात

- बेसॉल्ट खडकांमधील नैसर्गिक भेगा आणि तडे कारणीभूत

- जून आणि जुलै महिन्यात सर्वाधिक धक्के

दरम्यान भूगर्भातील लाव्हाच्या दोन थरातील गेरूच्या थरामध्ये पावसाचं पाणी जास्त प्रमाणात साठल्यामुळे पाण्याचा दाब वाढून भूकंपाचे धक्के बसत असल्याचा दावा भूगर्भ अभ्यासकांनी साम टिव्हीशी बोलताना केलाय. - दुसरीकडे नाशिकपाठोपाठ पालघर जिल्ह्यातही गेल्या तीन आठवड्यात जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातही भूकंपाचे पाच धक्के बसलेत...त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नाशिक आणि पालघरमध्ये वारंवार भूकंप होत असले तरी त्यांची तीव्रता सामान्य आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. मात्र नाशिक जिल्ह्यात यंदा अचानक भूकंपाचं प्रमाण का वाढलं? तेही कमी कालावधीत जास्तीत जास्त धक्के बसण्याचं कारण काय? याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे नागरिकांमधील संभ्रमाचं आणि भीतीचं वातावरण दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com