

नाशिक पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
सुरगाणा पेठ दिंडोरी कळवणमध्ये जमीन हादरली
नाशिक जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत
पालघर जिल्ह्यातही आज भूकंपाचे धक्के जाणवले. येथे 3.5 तीव्रतेचा बसला भूकंपाचा धक्का जाणवला. पालघरमधील धुंदलवाडी, आंबोली, कासा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. काही दिवसापूर्वी पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर नाशिकमधील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण भाग भूकंपाच्या धक्क्यानं हादरलाय.
दरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. आज दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी सुरगाण्यातील बोरगाव परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का बसलाय. मागील 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का, काल संध्याकाळी बसला होता भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले. आठवड्याभरात पाच ते सातवेळा भूकंप आल्यानं रामस्थ धास्तावलेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुंभमेळा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये विशेष भूकंप मापन केंद्र उभारण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की चारही तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, त्यांचे तंत्र जाणून घेतले पाहिजे. नाशिकच्या पश्चिम भागात भूगर्भात काही मेगा आहेत, त्यांच्यावर सततच्या येणाऱ्या ताणामुळे असे धक्के जाणवू शकतात. त्यातच सुरगाणा व इतर तालुक्यात अलीकडेच मुसळधार पाऊस झाला. ते पाणी जमिनीखाली झिरपले असून, त्याचा दाव तयार झाला. त्यामुळे दबाव वाढून परिणामी कंप झाला असावा.
एखाद्या मर्यादित परिसरात ठराविक कालावधीत वारंवार लहान-मोठ्या भूकंपाच्या घटना नोंदविल्या जाऊ शकतात. अशा घटनांत एकच स्पष्ट मुख्य भूकंप नसून भूकंपांची मालिका आढळल्यास त्याला शास्त्रीय भाषेत 'भूकंप-सगृह' असे संबोधले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.