Nida Khan Case : निदा खानला आश्रय देणं अंगाशी आलं, MIM नेत्याच्या घरावर बुलडोझर; महानगरपालिकेची कारवाई

Sambhajinagar MIM Leader Home Demolition : निदा खान धर्मांतर प्रकरणात मोठी कारवाई करत नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर चालवण्यात आला. या प्रकरणात राजकीय संबंध समोर आल्याने तपास अधिक तीव्र झाला आहे.
NIDA KHAN CASE: BULLDOZER ACTION ON CORPORATOR PROPERTY, POLITICAL LINKS EMERGE
NIDA KHAN CASE: BULLDOZER ACTION ON CORPORATOR PROPERTY, POLITICAL LINKS EMERGESaam Tv
Published On
Summary
  • निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

  • नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर आश्रय दिल्याचा आरोप

  • तीन मालमत्ता अनधिकृत असल्याचे उघड

  • महापालिकेकडून बुलडोझर कारवाई

  • प्रकरणात राजकीय कनेक्शनची चर्चा

Sambhajinagar MIM Leader Matin Patel Home Demolition छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक येथील TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून निदा खान पोलिसांना चकवा देत फिरत होती. अखेर तिला पोलिसांनी गुप्त पद्धतीने छापा टाकत अटक केली. ती ज्या घरात राहत होती ते घर मतीन पटेल यांचं असल्याचं नंतर उघडकीस आलं. तसेच ते अनधिकृत असल्याचं देखील महानगरपालिकेने म्हटलं आहे. दरम्यान या घटनेने निदा खानचं राजकीय कनेक्शन असल्याचं समोर आलं असून या प्रकरणात आणखी किती मासे गळाला लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर सुरु होते. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान काही दिवसांपासून फरार होती. पोलिसांनी तपासाची दिशा बदलत छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात छापा टाकला आणि तेथून तिला अटक केली. तपासादरम्यान ती ज्या घरात लपून बसली होती, ते घर नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालकीचे असल्याचे उघड झाले.

NIDA KHAN CASE: BULLDOZER ACTION ON CORPORATOR PROPERTY, POLITICAL LINKS EMERGE
Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी मतीन पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास अधिक तीव्र केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक महानगरपालिकेनेही त्यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात पटेल यांच्या मालकीची दोन घरे आणि एक कार्यालय अशा तीन मालमत्तांचे बांधकाम विनापरवानगी आणि नियमबाह्य असल्याचे आढळून आले.

NIDA KHAN CASE: BULLDOZER ACTION ON CORPORATOR PROPERTY, POLITICAL LINKS EMERGE
Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यातलं पाणी पिताय? थांबा! त्यापूर्वी 'हे' आधी करा

महापालिकेने तीन दिवसांपूर्वी नोटीस बजावत संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत आवश्यक परवानग्या किंवा कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने आज सकाळी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

NIDA KHAN CASE: BULLDOZER ACTION ON CORPORATOR PROPERTY, POLITICAL LINKS EMERGE
Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि कायदेशीर कारवाई कितपत पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com