Kharat case : विकृत खरातचा आणखी एक कारनामा समोर, बडे उद्योगपती अडकले हनी ट्रॅपमध्ये?

Ashok Kharat honey trap scanda case : अशोक खरात प्रकरणात हनी ट्रॅपचा धक्कादायक खुलासा! उद्योगपतींना जाळ्यात ओढून कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप. संपूर्ण प्रकरण आणि तपासाची माहिती वाचा.
Ashok kharat Court Case
Ashok kharat Court CaseSaam TV marathi news
Published On

ashok kharat honey trap case details : विकृत अशोक खरातचं आणखी एक कांड समोर आलंय... या खरातनं फक्त महिलांचं शोषण नाही तर बड्या धेंडांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी उकळलीय.. मात्र त्यासाठी खरातची मोडस ऑपरेंडी कशी होती? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

महिलांचं शोषण करणाऱ्या खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर आता या खरातच्या विकृतीचं आणखी एक कांड समोर आलंय... होय.... ब्लॅकमेल कांड... पाखंडी खरात अगदीच आश्रम सीरीजमधल्या बाबा निरालाप्रमाणे आधी महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार करायचा... महिलांना प्रेग्नेंट करायचा... आणि त्याच्याकडे आलेल्या श्रीमंत पुरुष भक्तांसोबत लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवायचा... त्यांच्यात संबंध घडवून आणायचा... आणि त्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन हनी ट्रॅपचं जाळं टाकायचा... असंच जाळं टाकून खरातनं नाशिकमधील श्रीमंत उद्योगपतींकडून 20 कोटींची खंडणी उकळल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय..

Ashok kharat Court Case
Kharat Case: अशोक खरातनं ५ जणांचा नरबळी दिला? धक्कादायक दावा, वाचा कोर्टात नेमकं काय काय झालं

त्याचं झालं असं की खरातनं एका महिलेला भीती घालत अत्याचार केला.. त्यानंतर त्या महिलेचा वापर हनी ट्रॅपसाठी सुरु केला.. नाशिकच्या एका श्रीमंत उद्योगपतीसोबत महिलेची ओळख करुन दिली...आधी मैत्री आणि नंतर महिलेसोबत उद्योगपतीचे शरीरसंबंध घडवून आणले...त्यानंतर खरातनं कट रचला..आणि महिला प्रेग्नेंट आहे.. हे तु काय केल? असं म्हणत उद्योगपतीला भीती घातली... हे प्रकरण मिटवण्यासाठी उद्योगपतीकडून 20 कोटीची खंडणी उकळली.. मात्र तरुणी आणि उद्योगपतीची भेट झाल्यानंतर खरातचा हा बनाव उघड झाला...

Ashok kharat Court Case
Election : पुण्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं, २६ ग्रामपंचायतीत धुरळा उडाला, वाचा सविस्तर

खरातचं हनी ट्रॅपचं प्रकरणही समोर आल्यानं या प्रकरणात फक्त एकाच उद्योगपतीला हा गंडा घातलाय की आणखीही राजकीय आणि प्रशासनातील अधिकारीही ढोंगी खरातच्या हनी ट्रॅपचे बळी ठरलेत... याचा तपास करुन खरातच्या ब्लॅकमेलिंगचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याची गरज आहे...

Ashok kharat Court Case
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण! तब्बल ३३ हजारांनी झालं स्वस्त; वाचा खरेदीची हीच योग्य वेळ आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com