Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री?

Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला आहे.
Ashok Kharat Case:
CM Devendra Fadnavis speaks on the Ashok Kharat case as demands grow for action against leaders linked through viral photos.saam tv
Published On
Summary
  • अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ

  • खरातसोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल

  • विरोधकांकडून नेत्यांवर कारवाईची मागणी

अशोक खरातचे राजकीय नेत्यांसोबत असणारे फोटोही चर्चेचा विषय ठरत आहेत. खरातवर राजकीय वरदहस्त असल्यानेच त्याने महिलांच्या अब्रुशी खेळ खेळण्याचा गोरख धंदा सुरू केला होता, असं म्हटलं जातंय. दरम्यान अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्या नेत्यांचे फोटो आहेत, त्या नेत्यांवर कारवाई होणार का असा सवाल राज्यातील जनता करत आहे. तसेच विरोधी पक्षातील नेतेही खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाते आहे. यामुळे ज्यांचे फोटो आहेत, त्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे.

Ashok Kharat Case:
Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरातची संपूर्ण कुंडली वाचून दाखवली. यावेळी भास्कर जाधवांनी नेत्यांच्या फोटोवरून प्रश्न केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं, असून फोटो असलेल्या नेत्यांची धाबे दणाणले आहे. अशोक खरात यांच्या संस्थेच्या संचालकांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

आर्थिकदृष्ट्या नाही तर संपूर्ण माहिती असतानाही कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. त्यानंतर राजकारणातील काही नेत्यांचे फोटो, नावं आली आहेत. जे गुंतले आहेत त्यांची चौकशी करणार का? असा सवालही भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

Ashok Kharat Case:
चांगल्या आयुष्यासाठी असेल तर मला तुझं...; उच्चशिक्षित महिलांच्या रांगा, योनी शुद्धीकरण, खरातचा धक्कादायक कारनामा उघड

ज्या-ज्या व्यक्तीविरोधात पुरावा मिळेल, त्या प्रत्येकाची चौकशी करु. आपण सगळे राजकारणातील आहोत. त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबतही येतो हे आपण पाहिलं आहे. पण फक्त फोटो सोबत आहे यावरुन आरोपी करता येत नाही. दरम्यान आपण डिलीटेड डेटाही संपूर्ण काढला जात आहे. या डेटामधून कोणाचा संपर्क होता का? कोणी व्यवहार केला आहे का? कोणी मेसेज केला का?

हे उघड होईल. जो कोणी असेल त्याची चौकशी होणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. एसआयटीमध्ये एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला प्रमुख केलं आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. आपण कोणालाही पाठीशी घालणार नाही. कोणीही थेट किंवा अप्रत्यक्ष मदत केली असेल तरी धडा शिकवला जाईल," असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com