मोठी बातमी! सहलीला निघालेल्या भाजप नगरसेवकांची बस हॉटेलच्या भिंतीला धडकली

BJP Corporators Bus Rams Into Hotel Wall : नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांची बस एका हॉटेलच्या भिंतीवर धडकली. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमधील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. 'क्रॉस-व्होटिंग' रोखण्याचे प्रयत्न सुरू असताना ही घटना घडली आहे.
BJP Corporators  Bus Rams Into Hotel Wall :
BJP CORPORATORS' BUS HITS HOTEL WALL IN NASHIK AMID HOTEL POLITICS AHEAD OF COUNCIL ELECTIONsaam tv
Published On
Summary
  • सहलीसाठी निघालेल्या भाजप नगरसेवकांच्या बसची हॉटेलच्या भिंतीला धडक बसली.

  • भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्वतः बस चालवताना हा प्रकार घडला.

  • या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झाली नाही

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

सहलीसाठी निघालेल्या भाजप नगरसेवकांची हॉटेलच्या भिंतीला धडल्याची घटना घडली आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बस चालकाला उतरवून स्वत: बसचे स्टेअरिंग हातात घेतली होती. परंतु बस सुरू होताच अनर्थ घडला. बस सुरू होताच हॉटेलच्या भिंतीला धडकली. या धडकेत बसचे किरकोळ नुकसान झाले आहे.

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीच्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात 'हॉटेल पॉलिटिक्स' पाहायला मिळत आहे. मतदानाच्या वेळी दगाफटका (क्रॉस व्होटिंग) टाळण्यासाठी भाजप आपल्या नगरसेवकांना अज्ञातसळी नेत आहे.

BJP Corporators  Bus Rams Into Hotel Wall :
Vidhan Parishad Election: सांगली साताऱ्यात भाजपला दगाफटका होण्याची भीती; नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेलं

दरम्यान नाशिक विधान परिषद निवडणूकीत भाजपने नगरसेवकांना व्हीपची बजावला आहे. भाजपच्या मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदारांकडून व्हीप जारी केला आहे. व्हीप आदेश देतांना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेही उपस्थित होते. नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हीप बजावण्याचे काम सुरू होतं.

व्हीप बजावल्यानंतर भाजप मतदारांची ठाण्यात सहल जाणार आहे. त्याचदरम्यान बस हॉटेलच्या भिंतीला धडकली. अतिउत्साहात शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बच चालकाला खाली उतरवलं. त्यानंतर ते स्वत: बस चालवू लागले. मात्र त्यावेळी हॉटेलच्या परिसरात असलेल्या भिंतीला धडकली.

BJP Corporators  Bus Rams Into Hotel Wall :
Maharashtra Politics: शरद पवार गटाच्या 'त्या' तीन आमदारांवर कारवाई होणार? काय आहे प्रकरण?

नाशिकचे सगळे नगरसेवक भिंवडीतील रिसॉर्टवर

नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी प्रचार थांबवला आहे. मात्र रिंगणात महायुतीचे नरेंद्र दराडे हे एकच उमेदवार आहे. तसेच विजयासाठी आवश्‍यक बहुमत हाती असूनही महायुतीला रिसॉर्ट पॉलिटिक्सचा अवलंब करावा लागतोय. 13 जूनला शिवसेनेच्या नगरसेवकांना नाशिकमधून ठाण्याकडे नेण्यात आले. या सर्व मतदार नगरसेवकांना भिवंडी येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com