भोंदू खरातची तब्बल ५ लाखांची फी, अमावस्या-पौर्णिमेला गाड्यांच्या रांगा; SIT तपासात धक्कादायक खुलासे

Ashok Kharat fraud : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात SIT तपासातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तब्बल ५ लाखांची फी, आलिशान जीवनशैली आणि फसवणुकीचे जाळे उघड झाले आहे.
Ashok Kharat
Ashok Kharat Case saam tv
Published On

Ashok Kharat SIT investigation details : नाशिकच्या भोंदू अशोक खरात याच्या नवीन आणि धक्कादायक काळ्या कारनाम्यांचा दररोज पर्दाफाश होतोय. एसआयटी तपासात हादरवणारी माहिती समोर आली आहे. खरात याची फी थब्बल ५ लाख रूपयांची असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. त्याशिवाय आलिशान जीवनशैलीचे आणि फसवणुकीचे धक्कादायक तपशील एसआयटी (SIT) तपासात समोर आले आहेत.

विमान प्रवास आणि ५ लाखांची फी

अशोक खरात याचा आवाका फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित नव्हता, तर त्याचे जाळे मोठे होते. एसआयटीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात केवळ दीड ते दोन तासांच्या भेटीसाठी (आऊटडोअर व्हिजिट) तब्बल ५ लाख रुपये फी उकळायचा. अंतर जितके जास्त, तितकी त्याची फी वाढत असे. भक्तांच्या घरी किंवा फार्महाऊसवर जाण्यासाठी तो महागड्या आणि आलिशान गाड्यांची मागणी करायचा. इतकेच नाही तर लांबच्या प्रवासासाठी त्याचा विमान प्रवासाचाच आग्रह असायचा.

अमावस्या आणि पौर्णिमेला गाड्यांच्या रांगा

अमावस्या आणि पौर्णिमेच्या मुहूर्तावर या भोंदू बाबाला आपल्या घरी नेण्यासाठी श्रीमंत भक्तांची चढाओढ असायची. पहाटेपासूनच खरातच्या घराबाहेर आलिशान गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. जो भक्त जास्त पैसे देईल, त्याच्याकडे खरात पहिले जायचा, अशी चर्चा आता परिसरात सुरू आहे.

Ashok Kharat
Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

पेढे, जडीबुटी अन् काळी फळे...

SIT च्या पथकाने सोमवारी खरातच्या कार्यालयाची झडती घेतली. अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. खरातच्या कार्यालयातून खराब झालेले पेढे, जडीबुटीसारखी दिसणारी काळी फळे आणि काही संशयास्पद यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. खरातकडे येणाऱ्या भक्तांची नोंद असलेली एक वहीदेखील पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातून अनेक बड्या लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat
MHADA lottery : म्हाडाकडून बंपर लॉटरी, मुंबईमध्ये फक्त २९ लाखांत घर, वाचा A टू Z माहिती

साऊंड प्रूफ काचा आणि गुन्ह्याचे रिक्रिएशन

खरातच्या कार्यालयातील दरवाजा आणि काचा 'साऊंड प्रूफ' (आवाज बाहेर न जाणारे) होत्या का? याची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. पीडितेचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी त्याने ही व्यवस्था केली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. तपासादरम्यान जेव्हा पोलिसांनी खरातला त्याच्या कार्यालयात नेले, तेव्हा तिथे झालेल्या प्रकाराची आठवण होऊन पीडितेला अश्रू अनावर झाले होते.

Ashok Kharat
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलमध्ये वाढू शकतो महागाई भत्ता, नवीन अपडेट समोर

तपासाची चक्रे फिरली, आणखी काय काय बाहेर येणार?

अशोक खरातची पोलीस कोठडी संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने एसआयटीने तपासाचा वेग वाढवला आहे. फसवणूक झालेल्या अनेक लोकांनी आता पोलिसांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. या हायप्रोफाईल भोंदू बाबाने आणखी किती जणांची आणि किती कोटींची फसवणूक केली आहे, याचे सत्य लवकरच समोर येईल. एसआयटी, गुन्हे शाखाकडून तपास वेगात करण्यात येत आहे.

Ashok Kharat
Unseasonal Rain : महाराष्ट्रावर निसर्गाचा कोप! अवकाळी पावसामुळे ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बळीराजा पुन्हा संकटात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com