Nashik Accident News : दोन मोटर सायकलची धडक, दोन जण गंभीर जखमी; अपघाताची थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

Nashik News : दोन मोटर सायकलची धडक, दोन जण गंभीर जखमी; अपघाताची थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद
Nashik Accident News
Nashik Accident NewsSaam tv

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक शहरातील रस्त्यावर दोन मोटारसायकलींचा अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या (Nashik) सुमारास घडली. यात दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची (Accident) ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Latest Marathi News)

Nashik Accident News
Jamner Crime News : दोन सख्या भावांनी बहिणीची केली हत्या; प्रेमसंबंधाचा संशय

नाशिक शहरातील सिडको- सातपूर परिसराला जोडणाऱ्या रोडवरील केवल पार्क येथे हा भीषण अपघात झाला आहे. केवल पार्क येथे दोन मोटर सायकलस्वार एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला रस्त्यावरून वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघाताची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Nashik Accident News
Ganpat Gaikwad Statement: त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट; आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टिका

दोन्ही जखमी रुग्णालयात 

अपघातात देवेंद्र सिन्हा आणि भूषण चौधरी या दोघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे रस्त्यावर खड्डे असल्याने हा अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने भरधाव वेगाने जातात, असाही दावा केला जात आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केलीय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com