Ganpat Gaikwad Statement: त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट; आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टिका

Kalyan News : त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट; भाजप आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टिका
Ganpat Gaikwad
Ganpat GaikwadSaam tv

अभिजीत देशमुख

कल्याण : आत्ता तर धनुष्यबाणपेक्षा रॉकेटपण चालतात. त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे. माझ्या निधीच्या फाईल्स कोणाच्या टेबलाखाली दाबून ठेवल्यात. इतकेच नाही तर सर्व सण येत आहे. पोलिसांवर ताण आहे. पोलिसांची मदत ही जनतेला मिळाली पाहिजे. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गुंडांना चार चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो; अशी टिका (BJP) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित केली आहे. (Live Marathi News)

Ganpat Gaikwad
Gondia News : सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया-आमगाव मार्ग बंदच; पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ

कल्याणमध्ये भाजप कार्यकारी नियुक्ती सभारंभात गायकवाड यांनी (Shiv Sena) शिवसेनेच्या शिंदे गटाला टिकेचे लक्ष्य केले आहे. तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील तुम्ही बोला, बोललात तर धार येईल अशा शब्दात आमदार गायकवाड यांना दुजोरा दिला. आमदार गणपत गायकवाड म्हणाले कि, २०१९ मध्ये शिवसेना भाजपमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीना उजाळा देत फक्त महापौर कोणाला बनवायचं हेच आता ठरवायचं असं सांगितले.

Ganpat Gaikwad
Jamner Crime News : दोन सख्या भावांनी बहिणीची केली हत्या; प्रेमसंबंधाचा संशय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळणारे आहेत : मंत्री रवींद्र चव्हाण 
यावेळी महापौर भाजपचा होणार. फक्त कोण होणार हे ठरवायचे आहे, असे सांगितले. मागच्या महापालिका निवडणूकीत शिवसेना भाजपमध्ये महापौर पदावरुन घडलेल्या राजकीय घडामोडींची आठवण करीत देत भाजपचा महापौर बसणार होता. मात्र शेवटच्या क्षणी गडबड झाली. ही गडबड मातोश्रीवरून झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महापौर भाजपचा व्हायला पाहिजे. एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहे. त्यामुळे आपल्याला संधी आहे. आत्ता फक्त महापौर कोण बसावयाचा हाच विषय आहे; असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com