Jamner Crime News : दोन सख्या भावांनी बहिणीची केली हत्या; प्रेमसंबंधाचा संशय

Jalgaon News : दोन सख्या भावांनी बहिणीची केली हत्या; प्रेमसंबंधाचा संशय
Jamner Crime News
Jamner Crime NewsSaam tv

तोंडापूर (जळगाव) : जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसराला लागून असलेल्या सोयगाव तालुक्यातील राक्षा (Jamner) शिवारात संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधाच्या कारणावरून दोन भावांनी बहिणीची हत्या केली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस (Police) ठाण्यात एकूण ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Jamner Crime News
Dhule News : पावसाची संततधार; थाळनेर- होळनांते रस्त्यावरील पूल खचला

चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे.  तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई- वडील आणि भावांना संशय होता. दरम्यान, शनिवारी सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय ३०) हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. घाबरलेल्या चंद्रकला यांनी माझे भाऊ आणि आई वडील माझा जीव घेणार आहे. मला वाचवा, कोठे तरी लपवा अशी त्यांनी शमीम (Crime News) यांच्याकडे विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

दरम्यान काही वेळात चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा आणि शिवाजी बावस्कर हे दोघे  हातात कुऱ्हाड घेऊन तेथे आले. शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकलाचा शोध घेत मारहाण सुरु केली. तसेच हातात असलेल्या कुऱ्हाडीने चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी चंद्रकलाचे आई वडिल देखील आले. त्यांनी शमीम यास देखील मारहाण करत दोन्ही मुलांना चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे सांगितले. दरम्यान शमीम त्यांच्या तावडीतून सुटला आणि थेट पोलीस ठाण्यात पोहचला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

Jamner Crime News
Gondia News : सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया-आमगाव मार्ग बंदच; पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ

पोलिसांची घटनास्थळी भेट
बावस्कर भावांच्या तावडीतून सुटलेले शमीम सुरवातीला थेट पहूर पोलिस ठाण्यात पोहचले. त्याने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पहुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप. अमोल गर्जे. बनसोडे पथकासह घटनास्थळी पोहचले. यानंतर पहूर पोलिसांनी घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com