हाय व्हाेल्टेज घडामाेडी टाळण्यासाठी रत्नागिरीत मास्टर प्लॅन

narayan rane uddhav thackeray
narayan rane uddhav thackeray
Summary

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे समर्थक रत्नागिरीतून सिंधुदूर्गातून चिपळूणला रवाना झाले आहेत. सिंधुदूर्गातून शेकडो राणे समर्थक चिपळूणच्या दिशेने येऊ लागले आहेत. नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक निघाल्याने राणे समर्थक चिपळूणाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही भागात राणेंवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, तर काही भागात त्यांच्या निषेर्धात फलक लावण्यात येत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात साेमवारी रात्री नारायण राणेंची narayan rane जन आशीर्वाद यात्रा पाेचली. या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या काेकणवासीयांना त्यांनी काेणत्या ही कामात सर्वताेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राणेंनी महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे uddhav thackreay यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी प्रशासनासह पाेलिस सज्ज झाले आहेत.

narayan rane uddhav thackeray
शेट्टींनी मुश्रीफांसह जयंत पाटलांना काेल्हापूरात दिले चॅलेंज

आज (मंगळवार) सकाळपासून भाजप - सेनेचे आमदार आमने-सामने येऊ नयेत म्हणून मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची सोय करण्यात आली आहे. इतर आमदारांची खासगी हॉटेल्समध्ये सोय करण्यात आली आहे. याबराेबरच विश्रामगृहावरचा पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन बैठकीसाठी सेनेचे पालकमंत्री रत्नागिरीत येणार आहेत. त्यामुळे बैठकीचे ठिकाणी सुद्धा बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे. मंत्री राणेंसोबत येणारे आमदार आणि शिवसेनेचे आमदार एकत्र येऊ नयेत याची खबरदारी घेण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.

दरम्यान नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक निघाल्याने राणे समर्थक चिपळूणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबराेबरच राणे समर्थक समाज माध्यमातून त्यांना पाठींबा दर्शवित आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com