शेट्टींनी मुश्रीफांसह जयंत पाटलांना काेल्हापूरात दिले चॅलेंज

hasan mushrif raju shetti jayant patil
hasan mushrif raju shetti jayant patil
Published On

कोल्हापुर : पूरग्रस्तांना पुरेशी मदत न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज (साेमवार) माेर्चा काढला. तेथे आंदाेलक शासनास मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बाेलतना स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी raju shetti यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ hasan mushrif , जलसंपदा मंत्री जयंत पाटील jayant patil यांच्यावर सडकून टीका केली.

hasan mushrif raju shetti jayant patil
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास संपवले; जिम मालकासह दाेघे अटकेत

पूरग्रस्त भागास दिलेली मदत जर हीच असेत तर मुख्यमंत्र्यांविषयीचा असलेला आदर कमी हाेईल असे शेट्टींनी नमूद केले. ते म्हणाले मुलांची शैक्षणिक फी माफ करा, पूरग्रस्त भागातील पुलांचा भराव काढा, ज्यांची घरे पडले आहेत त्यांना भरीव मदत द्या आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. अडचणीच्या काळात नियमीत कर्ज भरणा-यांना ताबडताेब कर्ज माफी द्या अशी मागणीही असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेला पूरेशी मदत दिली आहे असे हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील हे सांगत आहेत या प्रश्नावर राजू शेट्टींनी ऊस ऊत्पादक शेतक-यांना १३५ रुपयेच देणार असे सांगण्याचे धाडस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील hasan mushrif raju shetti jayant patil यांनी आपआपल्या मतदारसंघात जाऊन करावे असे आव्हान दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com