पोलिसांचा शासकीय निधीवर डल्ला; ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार,२ लिपिकांसह ५ पोलिसांवर गुन्हा दाखल

Nandurbar Police Scam: नंदुरबार पोलीस दलातील विविध विभागांमधील सात माजी कर्मचाऱ्यांवर अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्माचाऱ्यांचा पगार आणि शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Nandurbar Police Scam:
Nandurbar Police Scam? 7 Personnel Booked In ₹47.60 Lakh Alleged Misappropriation Casesaam tv
Published On
Summary
  • नंदुरबार पोलीस दलात ४७ लाखांचा अपहार

  • नंदुरबारमध्ये सात पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

  • ४७ लाख ६० हजार रुपयांच्या अपहाराचे नंदुरबार प्रकरण

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

पोलीस चोर, दरोडेखोरांना पकडून त्यांना तुरुंगात डांबत असतात. कायदा-सुव्यवस्था सुरळीत करत असतात. परंतु गेल्या पोलीसच काळेधंदे करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. पुण्यातील पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकरण ताजे असतानाच नंदुरबारमधील पोलिसांनी शासकीय निधीवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवणारी खाकी वर्दीच आता भ्रष्टाचारामुळे डागाळल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

Nandurbar Police Scam:
Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

शासकीय सेवार्थ प्रणालीचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल करत तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयांचा पगार अपहार केल्याची बाब समोर आलीय. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात २ वेतन लिपिक आणि ५ पोलीस अंमलदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपनगर पोलीस ठाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे व मोटार परिवहन विभागातील एकूण सात तत्कालीन कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Nandurbar Police Scam:
Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

पोलीस कर्मचाऱ्यांनीच पगाराच पैसा लाटल्याचा प्रकार घडल्यानं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस अंमलदारांच्या पगाराव्यतिरिक्तची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतली. माध्यमातून ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

सन २०२३ ते जून २०२४ दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन लिपिक मनोज बुवा आणि महेंद्र शिंदे यांनी इतर ५ पोलीस अंमलदारांशी संगनमत केले. अतिरिक्त वेतन स्वतःच्या फायद्यासाठी मंजूर करून घेत ते संबंधित पोलीस अंमलदारांच्या बँक खात्यात वर्ग केले. दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण ४७ लाख ६० हजार रुपयांचा शासकीय निधी परस्पर लाटल्याचे तपासात उघड झाले आहे. फिर्यादी संदीप सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाहीये.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज जगदीशगीर बुवा, वरिष्ठ श्रेणी लिपिक महेंद्र भगवान शिंदे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील मयूर बाळू गवळी, तत्कालीन मपोहेकॉ. प्रीती फुलजी कोकणी, मपोशि. ज्ञानेश्वरी हरिश्चंद्र घुगे, पोशि. देवीदास पांडू गागडे, हेकॉ. किरण अर्जुन वळवी या सात जणांनी संगनमत करून अतिरिक्त वेतन स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या 'सेवार्थ' प्रणालीमध्ये दाखल करत शासनाची दिशाभूल करत ते मंजूर करून घेतले. तसेच ही रक्कम पोलीस अंमलदार यांच्या पगार खात्यावर जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी आपसात वाटून घेतले होते.

धुळ्यात या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनोज जगदीशगीर बुवा (तत्कालीन नेमणूक - पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार, सध्या नेमणूक - पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे) हे कनिष्ठ लिपीक वेतन पडताळणी कार्यरत होते. २०१५ ते २०२३ पर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी पैशाचा अपहार केल्याचा संशय आला. त्यानंतर नंदूरबार येथील पोलीस अधीक्षकांनी तपास करण्याचे आदेश दिले. तपासाअंती ४७ लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आल्याची माहिती संदीप पवार ,पोलीस निरीक्षक नंदुरबार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com