Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशमध्ये तरुणाने गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकला. लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणाने हे भयंकर कृत्य केले.
Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
Madhya Pradesh CrimeSaam Tv
Published On
  • मध्य प्रदेश भयंकर हत्याकांड

  • लग्नाला नकार दिल्याने तरुणाकडून गर्लफ्रेंडची हत्या

  • इंदूरमध्ये तरुणीची गळा दाबून हत्या

  • पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला

मध्य प्रदेशमध्ये कुलर मॅकेनिकने गर्लफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने गर्लफ्रेंडची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून टाकला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यात आलेली तरुणी आयसीआयसीआय बँकेत कर्मचारी होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मयांक शाक्य हा बँक कर्मचारी पलकवर लग्नासाठी दबाव टाकत होता. जेव्हा तिने लग्नाला नकार दिला तर आरोपीने तिला मारहाण केली आणि तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पलकचा मृतदेह किचनमध्ये सोडून आरोपीने पळ काढला.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

पोलिसांनी सांगितले की, २६ वर्षीय पलक ही हरदा जिल्ह्यातील टिमरनी येथे राहणारी होती. ती इंदुरच्या तपेश्वरी बाग कॉलनीमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत होती. ती आयसीआयसीआय बँकेमध्ये नोकरी करत होती. रविवारी घरामध्येच तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यावेळी घटनास्थळावरील परिस्थिती पाहून असे वाटत होते की जेवण बनवताना आग लागून तिचा मृत्यू झाला असावा. गॅस सिलिंडर आणि शेगडी वेगळी पडली होती. शेगडीवर चिरलेली भाजी पडलेली होती. त्यामुळे सुरूवातीला गॅसला आग लागून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात होता.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

या घटनेला वेगळं वळण तेव्हा आले जेव्हा पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये एक तरुण चेहऱ्याला कपडा बांधून पलकच्या घरामधून बाहेर पडत होता. त्याच्या पाठीवर बॅग होती. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने कॉल डिटेल्स आणि लोकेशनची तपासणी केली. तपासातून ही व्यक्ती मयांक असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा कबुल गेला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला
Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

आरोपी मयांक कुलर रिपेरिंगचे काम करतो. सहा वर्षापूर्वी पलक आणि मयांक यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांचे नेहमी फोनवर बोलणं व्हायचं. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मयांकला पलकसोबत लग्न करायचे होते. पण पलकच्या कुटुंबीयांनी या लग्नाला नकार दिला. पलकच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले. त्यामुळे संतप्त झालेल्या मयांकने पलकची हत्या करण्याचा कट रचला.

त्यानंतर तो पेट्रोलची बॉटल घेऊन पलकच्या घरी पोहचला. लग्नावरून दोघांमध्ये सुरूवातीला वाद झाला. या वादादरम्यान संतप्त होत मयांकने पलकला जमिनीवर ढकलून दिलं. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला. पलकच्या मृत्यूचे वृत्त करताच तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com