

ऑगस्टमध्ये बँका १४ दिवस का बंद राहणार
आरबीआयची ऑगस्ट महिन्याची बँक सुट्टी यादी
स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनमुळे बँकांना सुट्टी
बँकेच्या ग्राहकांसाठी आणि बँकेतील नोकरदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये देशभरातील बँक १४ दिवस बंद असणार आहेत. आरबीआयनं बँकांना १४ दिवस का सुट्टी दिली आहे? कोण-कोणत्या दिवशी बँक बंद असतील? याची माहिती जाणून घेऊ.
ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिन, राखी आणि इतर काही सण येत असल्याने, शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. जर तुम्ही ऑगस्ट २०२६ मध्ये बँकेच्या शाखेला भेट देणार असाल, तर त्याआधी सुट्ट्यांची यादी पाहून घ्यावी. आरबीआयच्या (RBI) सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे पुढील महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका अनेक दिवस बंद राहतील, मात्र, ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहतील.
२ ऑगस्ट (रविवार)
२ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. ही साप्ताहिक सुट्टी आहे.
४ ऑगस्ट (मंगळवार)
'केर पूजा'निमित्त आगरतळा (त्रिपुरा) येथील बँका ४ ऑगस्ट रोजी बंद राहतील. इतर राज्यांमधील बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
८ ऑगस्ट (शनिवार)
महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने ८ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. यासह गंगटोक (सिक्कीम) येथे 'टेंडोंग ल्हो रुम फाट' (Tendong Lho Rum Faat) निमित्त सुट्टी असणार आहे.
९ ऑगस्ट (रविवार)
रविवार असल्याने ९ ऑगस्ट रोजी देशभरातील बँका बंद राहतील.
१३ ऑगस्ट (गुरुवार)
'पॅट्रियट्स डे' (देशभक्त दिन) निमित्त इम्फाळ (मणिपूर) येथील बँका १३ ऑगस्ट रोजी बंद राहतील.
१५ ऑगस्ट (शनिवार)
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
१६ ऑगस्ट (रविवार)
रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका राहतील बंद.
१९ ऑगस्ट (बुधवार)
महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त १९ ऑगस्ट रोजी आगरतळा (त्रिपुरा) येथील बँका बंद राहतील.
२२ ऑगस्ट (शनिवार)
चौथा शनिवार असल्याने २२ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
२३ ऑगस्ट (रविवार)
रविवारी असलेल्या साप्ताहिक सुट्टीमुळे २३ ऑगस्ट रोजी देशभरातील बँका बंद राहतील.
२५ ऑगस्ट
कोच्ची आणि तिरुवनंतपुरम केरळ तसेच आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे मिलाद-उन- नबी (ईद-ए-मिलाद) आणि प्रथम ओणम च्या सणामुळे बँक बंद असतील.
२६ ऑगस्ट रोजी कुठे-कुठे असेन सुट्टी
बेलापूर, मुंबई आणि नागपूर (महाराष्ट्र) येथे बँका बंद राहतील. बेंगळुरू (कर्नाटक), भोपाळ (मध्य प्रदेश); चेन्नई (तामिळनाडू), डेहराडून (उत्तराखंड), हैदराबाद (तेलंगणा), इंफाळ (मणिपूर), जम्मू आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर), कानपूर आणि लखनौ (उत्तर प्रदेश), कोची आणि तिरुवनंतपुरम (केरळ), नवी दिल्लीसह पाटणा (बिहार), रायपूर (छत्तीसगड), आणि रांची (झारखंड) ईद-ए-मिलाद (बारावफत), तिरुवोनम आणि इतर स्थानिक सणांमुळे येथील बँकांना सुट्टी असेल.
२८ ऑगस्ट रोजी
अहमदाबाद (गुजरात), भोपाळ (मध्य प्रदेश), डेहराडून (उत्तराखंड), गंगटोक (सिक्कीम), जयपूर (राजस्थान), जम्मू आणि श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर), कानपूर आणि लखनौ (उत्तर प्रदेश), कोची आणि तिरुअनंतपुरम (केरळ) आणि उत्तराखंड (केरळ) आणि उत्तर प्रदेशमध्ये बँका बंद राहतील. नारायण गुरु जयंती, अयंकाली जयंती आणि पांग-लबसोलच्या सणामुळे बँक बंद असतील.
३० ऑगस्ट
रविवार असल्यामुळे ३० ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
बँकेच्या शाखा सुट्ट्यांमुळे बंद असल्यानं युपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बॅकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, ऑनलाईन फंड ट्रान्सफर आणि बिल पेमेंट सारख्या डिजिटल सर्व्हिस नेहमीप्रमाणे चालू असतील. त्यामुळे, ऑनलाइन व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.