Pune Police Crime: लोणावळ्यात पर्यटकांकडून खंडणी मागितल्याचं प्रकरण ताज असतानात पुणे ग्रामिण पोलिसांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पुण्यातल्या नवले पूल परिसरात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल 1 कोटींची रोकड लुटण्याचा प्रयत्न चोरांनी नव्हे तर खाकीतल्या पोलिसांनीच केल्य़ाचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. मात्र लुटारू पोलिसांचं बिंग फुटलं आणि पुणे पोलिसांचा आणखी एक कारनामा समोर आला. राजगड पोलीस ठाण्यांतर्गत खेड-शिवापूर पोलीस चौकीतल्या महिला पोलीस हवलदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांनी खाकीला लाज आणणारा प्रकार केलाय.
पुणे पोलीस झाले दरोडेखोर
- 18 जुलैला नवले पुलाजवळ हर्षवर्धन पवार या व्यावसायिकाला अडवून पोलीस असल्याचं सांगून दरवाजे उघडण्यास भाग पाडलं
- गाडीतील 1 कोटीची रोकड असलेल्या 2 बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न
- पोलिसांनी पीडित व्यक्तीच्याच गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं
- महिला पोलिसाच्या मदतीनं तोतया पत्रकारानं ती रक्कम स्वतःच्या बाईकच्या डिक्कीत ठेवली
- प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पुन्हा रक्कम बॅगेत ठेवली, संपूर्ण प्रकार CCTVत कैद
- तोतया पत्रकाराला पोलिसांकडून अटक, 9 जणांवर गुन्हा दाखल, 6 जण अद्यापही फरार
हर्षवर्धन पवार बँकेच्या दिशेनं जात असताना हा प्रकार घडला. खेड-शिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. सुरुवातीला दोन पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली गेली मात्र नंतर पुरवणी गुन्ह्यात पोलिसांची नावं पोलिसांनी समाविष्ट करावी लागली. महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित इरफू मेस्री यांचं निलंबन करण्यात आलं. तर आशिष तिवारी नावाच्या तोतया पत्रकारालाही अटक करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच लोणावळा इथं पर्यटकांना खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एकदा खाकीची लक्तरं वेशीला टांगण्यात आलीयत. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर आहे. अशा खाकीनंच लूट सुरू केली तर पुणेकरांची रक्षा कोण करणार?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.