

नंदुरबार पोलिसांनी मोठ्या वन्यजीव तस्करीचा भांडाफोड केला
भाजीच्या कॅरेटमध्ये लपवून प्राण्यांची तस्करी केली जात होती
५ कोल्हे, १९० तितर आणि ९५ पोपटांची सुटका
सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
पुष्पा स्टाईलने भाजीच्या कॅरेटच्या आडून वन्य प्राण्यांची तस्करीचा भांडाफोड नंदुरबार पोलिसांनी केला आहे. महाराष्ट्रातून गुजरात मध्ये वन्य प्राण्यांची तस्करी केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळ केलेल्या कारवाईत एका आयशर ट्रकमधून कोल्हे आणि तीतर तसेच जंगली पोपटाची होणारी तस्करी रोखली आहे. प्राण्याची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत पाच भारतीय कोल्हे, १९० तितर आणि ९५ जंगली पोपट जप्त केली आहेत.
एका आयशर ट्रकमध्ये मालेगावहून गुजरातच्या दिशेने हे वन्य प्राणी नेले जात जात होते. पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, त्याआधारे नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा वनविभाग आणि विसरवाडी पोलिसांनी सुरत-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी जवळ नाकेबंदी करत प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना पकडलं आहे. पोलिसांनी पकडलेल्या आयशर ट्रकच्या मागच्या बाजूला भाजीचे कॅरेट ठेवले होते. त्याच्या आडून वन्य प्राण्यांची पिंजऱ्यांमध्ये भरले होते.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर पुन्हा दाखल केला असून पंचवीस लाखांचा मुद्दे माल देखील जप्त केला आहे. कोल्ह्यासारख्या जंगली प्राण्यांची तस्करी नेमकी कोणासाठी आणि कशासाठी याबाबत अद्यापही माहिती मिळू शकलो नाही तरी पोलीस तपासातून याचा उलगडा होणार आहे. पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहनाद्वारे वन्य प्राण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार नाकेबंदी करण्यात आली आणि आयशर ट्रक पकडण्यात आले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मालेगाव ते गुजरातच्या मार्गावरून वन्य प्राण्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर साफळा रचण्यात आला आणि ही तस्करी रोखली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.