

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या
दगड आणि कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू
महिलेने तरुणावर हल्ला करत जागीच संपवलं
नाशिक हत्याकांडाच्या घटनेमुळे हादरले. नाशिकमध्ये एका तरुणाची भरदिवसा दगडाने हल्ला करत आणि कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिकच्या विल्होळी परिसरात ही घटना घडली. महिलेसह एका व्यक्तीने तरुणाची निर्घृण हत्या केली. कोयत्याने वार आणि दगडाने ठेचून त्याला जागीच संपवण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला आहे. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या तरुणाच्या हत्येमागचं कारण अस्पष्ट आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपींनी तरुणाच्या डोळ्यात आधी मिरची पूड टाकली. त्यानंतर या तरुणावर त्यांनी दगडाने हल्ला केला आणि कोयत्याने वार केले. तरुणाचा मृत्यू होईपर्यंत महिला त्याच्यावर कोयत्याने हल्ला करतच राहिली. या घटनेनंतर दोघेही दुचाकीवर बसले आणि निघून गेले. त्यांनी तरुणाची हत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या व्हायरल व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या नाशिकमध्ये ही हत्याकांडाची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.