Dead Rat Found in khichdi : यॅक यॅक, ईsss! हॉटेलमध्ये ग्राहकाला जेवताना खिचडीत आढळला मेलेला उंदीर, कुठे घडली घटना?

Dead Rat Found in khichdi latest News : हॉटेलमध्ये जेवताना खिचडीत मेलेला उंदीर आढळल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर ग्राहकाने एकच संताप व्यक्त केला आहे. ग्राहकाने थेट अन्न आणि औषध प्रशासन विभागाला तक्रार केली.
nanded
Dead Rat Found in khichdi Saam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : मागील काही वर्षांपासून हॉटेल आणि अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या, मेलेली पाल आढळण्याचा घटना वाढल्या आहेत. नांदेडमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदेडमध्ये एका हॉटेलमध्ये खिचडीत मेलेला उंदीर आढळल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर ग्राहकाने एकच संताप व्यक्त केला. त्यानंतर ग्राहकाने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषणाच्या आहारात चक्क अळ्या आढळल्याची घटना घडली होती. या प्रकारानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आहारात अळ्या आढळल्याच्या प्रकारानंतर बालकांच्या आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता नांदेडमध्ये खिचडीत उंदीर आढळल्याची घटना घडली.

nanded
Shocking Video : किळसवाणा प्रकार! टॉयलेटमधील नळाच्या पाण्याने बनवलं जेवण, मेडिकल कॉलेजमधला व्हिडीओ व्हायरल
nanded
Shocking News : भयंकर! मेकअप करताना चूक नडली; गरोदर महिलेने बॉलपिन गिळली

नांदेडच्या सिडको भागातील एका हॉटेलमध्ये ग्राहकाला खिचडी खाताना त्यात चक्क मृत उंदीर आढळल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त ग्राहकाने अन्न आणि औषध प्रशासनाकडे रीतसर लेखी तक्रार केली. श्रीकांत बिरादार नावाच्या या ग्राहकासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याने हॉटेल मालकाच्या हे निदर्शनास आणून देताच हॉटेल मालकाने बिल देऊ नका पण चर्चा करू नका, अशी विनंती केल्याचे तक्रारीत म्हटले.

nanded
Shocking News: पोटच्या लेकाचं नशेत संतापजनक कृत्य, जन्मदात्या आईची हत्या करुन मृतदेह घरातच पुरण्याचा प्रयत्न, पण...

नेमकं काय घडलं?

नांदेडच्या एका हॉटेलमध्ये श्रीकांत बिरादार खिचडी खायला गेले. श्रीकांत हे खिचडी खात असताना त्यांच्या प्लेटमध्ये उंदीर आढळला. त्यानंतर श्रीकांत यांनी हॉटेल मालकाला ही बाब निदर्शनास आणून दिली. या प्रकारानंतर हॉटेल मालकाने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, ग्राहक श्रीकांत यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली. तसेच ग्राहकाने न्याय मिळवून देण्याची मागणी केली. नांदेडमधील या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाल्याची माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com