Shocking News : भयंकर! मेकअप करताना चूक नडली; गरोदर महिलेने बॉलपिन गिळली
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये गरोदर महिलेसोबत भयंकर घटना घडली आहे. मेकअप करताना गरोदर महिलेने चुकून बॉलपिन गिळल्याची घटना घडली आहे. बॉलपिन चुकून तोंडात गेल्यानंतर महिला खूपच घाबरली. तिचे कुटुंबीय देखील घाबरले. ही महिला ६ महिन्यांची गरोदर आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गरोदर महिलेने बॉलपिन गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला गरोदर असल्याने डॉक्टरांनी एक्स-रे किंवा सीटीस्कॅन न करण्याचा अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेतला. डॉक्टरांनी वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने या महिलेचे प्राण वाचवलं आहे. या भयंकर प्रकारामुळे रात्रभर महिलेला त्रास सहन करावा लागला आहे.
मेकअप करताना आणि स्कार्फ बांधताना तोंडात ठेवलेली बॉलपिन एका महिलेच्या पोटात गेली. ही महिला ६ महिन्यांची गरोदर आहे. या महिलेला कौटुंबीक कार्यक्रमाला जायचे होते. त्यासाठी महिला मेकअप करत होती. यावेळी तिने स्कार्फ फिट ठेवण्यासाठी लावली जाणारी बॉलपिन तोंडात ठेवली. गरोदर महिलेने पिन चुकून गिळली. तोंडात ठेवलेली ही पिन थेट महिलेच्या जठरात गेली. यामुळे महिला भयभीत झाली.
महिला 6 महिन्यांची गरोदर असल्याने कुटुंबीय घाबरले. गरोदर असल्याने एक्स-रे किंवा सीटीस्कॅन करणे शक्य नव्हते. डॉक्टरांनी एंडोस्कोपीचा पर्याय सांगितला. महिला जेवली असल्याने इंडोस्कोपी देखील तात्काळ करणे शक्य नव्हते. अखेर महिलेने कशीबशी रात्र काढावी लागली. सकाळी इंडोस्कोपीच्या माध्यमातून पिन काढण्यात डॉक्टरला यश आले. या महिलेच्या पोटात बाळ असल्याने बाळाला आणि महिलेला धोका होता. मात्र धोका टळला आहे. आई आणि पोटातील बाळ दोघेही सुखरूप आहेत.
महिला आणि पोटातील बाळ व्यवस्थित असल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. गरोदर महिलेच्या पोटातून बॉलपिन काढल्यानंतर भीती कमी झाली. डॉक्टरांनी तातडीने योग्य उपचार केल्यानंतर गरोदर महिलेची भीती कमी झाली. तसेच गरोदर मुलाच्या पोटातील बाळाचीही प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.