Gwalior Doctor Case: हॉस्टेलजवळ बोलवलं, बळजबरी केली, ग्वाल्हेरमध्ये सहकाऱ्याने महिला डॉक्टरवर केला अत्याचार

Gwalior Crime : मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरच्या गजराराजा मेडिकल कॉलेजच्या परिसरात ही घटना घडली आहे. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक के
Gwalior Doctor Case
Gwalior Doctor CaseSaam Tv
Published On

Gwalior Doctor Case: मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ग्वाल्हेरच्या एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना कम्पू पुलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (५ जानेवारी) रोजी ग्वाल्हेरच्या गजराराजा मेडिकल कॉलजच्या परिसरात हा प्रसंग घडला आहे. पीडितेवर तिच्या २५ वर्षीय सहकाऱ्याने अत्याचार केला आहे. पीडित महिलाडॉक्टरने कन्पू पोलिस ठाण्यामध्ये सहकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ग्वाल्हेर शहराचे पोलीस अधिक्षक अशोक जादोन यांनी या प्रकरणाचा माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला डॉक्टर एक परीक्षा देणार होती. ती कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती. तिच्यासोबत असणाऱ्या सहकारी ज्युनियर डॉक्टरने तिला जुनाट बंद पडलेल्या हॉस्टेलजवळ भेटायला बोलावले. पीडित डॉक्टर हॉस्टेलपाशी पोहोचल्यानंतर आरोपीने धमकी देत तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्यावर आरोपीने बळजबरीने अत्याचार केला.

Gwalior Doctor Case
ह्रदयद्रावक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच आई-वडिलांनी संपवले आयुष्य

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधील या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागच्या काही महिन्यांपासून देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरुन देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

Gwalior Doctor Case
MP Crime : भाजप नेत्याने स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, भावाने सांगितलं आत्महत्येचं धक्कादायक कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com