MP Crime : भाजप नेत्याने स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, भावाने सांगितलं आत्महत्येचं धक्कादायक कारण

MP BJP Leader : मध्यप्रदेशमधील भाजप पक्षाचे सरचिटणीस यांनी गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पैश्यांच्या व्यवहारामुळे ते काही दिवसांपासून तणावात होते. तणावातून त्यांनी हा निर्णय घेतला.
Bjp leader killed himself
Bjp leader killed himselfTwitter (x)
Published On

MP Crime : मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने आत्महत्या केली आहे. त्यांनी पिस्तुलाने गोळी झाडून स्वत:चा जीव घेतला. ही घटना काल दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. ही घटना ग्वाल्हेरच्या दतिया भागामध्ये घडली आहे.

मृत व्यक्तीचे नाव जितेंद्र मेवाफरोश असे आहे. ते भाजप पक्षाचे सरचिटणीस आणि खटीक समाजाचा जिल्हाध्यक्ष आहेत. जितेंद्र यांच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात गोळी झाडली गेल्याचा आवाज आला आणि घरातले सर्वजण बाहेर पडले. याच दरम्यान जिंतेद्र मेवाफरोश यांनी स्वत:ला गोळी मारल्याचे समजले. कुटुंबातील सदस्यांनी शेजारच्या लोकांच्या मदतीने जितेंद्र यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी जितेंद्र मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांनी आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. जितेंद्र यांचे बंधू वीरेंद्र मेवाफरोश यांनी पोलिसांसमोर संशयित आरोपींची माहिती दिली. वीरेंद्र मेवाफरोश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सहारा कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्या सांगण्यावरुन काही लोकांनी सहारा कंपनीत पैसे गुंतवले होते. हे पैसे परत घेण्यासाठी हे लोक जितेंद्रवर दबाव टाकत होते. या दबावाला कंटाळून जितेंद्र यांनी परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली.

Bjp leader killed himself
Pune Police Commissioner: पुण्यातील गावगुंड, गँगस्टर्सना कडक 'वॉर्निंग' ; पोलीस आयुक्त म्हणाले, शहर सोडून जा नाही तर...

वीरेंद्र पुढे म्हणाले, अंकित श्रीवास्तव आणि पार्षद रिंकू दुबे या दोघांकडे जितेंद्र पैसे थकबाकी होते. जितेंद्र यांना घर आणि जमीन ते दोघे त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते. या दोघांच्यामुळे जितेंद्र यांनी आत्महत्या केली आहे. घटना ज्यावेळी घडली तेव्हा फटाका फुटल्यासारखा आवाज आला. ओरडल्याचा आवाज आल्याने सर्वजण घराबाहेर आले आणि हा प्रकार समोर आला.

Bjp leader killed himself
Torres Scam : पैसे डबलचा मोह नडला, कंपनीलाच टाळं; गुंतवणूकदार संतापले, थेट ऑफिस गाठून राडा केला!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com