Pune Police Commissioner: पुण्यातील गावगुंड, गँगस्टर्सना कडक 'वॉर्निंग' ; पोलीस आयुक्त म्हणाले, शहर सोडून जा नाही तर...

Pune Police Crime Awareness: बेकायदेशीर धंदे, गँग चालवून खंडणी मागणारे, बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावणाऱ्या टोळक्यांना, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम देत इशारा दिलाय.
Pune Commissioner
Pune CommissionerSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

बेकायदेशीर धंदे, गँग चालवून खंडणी मागणारे, बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावणाऱ्या टोळक्यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'वॉर्निंग' दिली आहे. कुठले ही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ. असा सज्जड दम देखील त्यांनी गुंडांना दिला आहे. पोलीस आयुक्तांनी हा थेट इशारा एका कार्यक्रमातील भाषणादरम्यान दिला आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ ५, पुणे शहराच्या वतीनं किमती मुद्देमाल वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी दमदार भाषण दिलं. तसेच भाषणादरम्यान आयुक्तांनी गुन्हेगारी प्रकरणाला आळा घालण्यासाठी गँगस्टर गुंडांना वॉर्निंग दिली आहे. कुठले ही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

Pune Commissioner
Pune Crime: पुण्यात महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की, दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल

भाषणावेळी, 'कुठले ही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा, नाहीतर तुमच्या ७ पिढ्यांची आठवण करून देऊ'. असा थेट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पोलीस ठाण्यातील बऱ्याच वर्षांपासून पडलेल्या बेवारस मुद्देमालांसदर्भात देखील पोलीस आयुक्त कुमार यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

Pune Commissioner
Pune Crime: खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याचा राग, तरुणाने जिवलग मित्रालाच संपवलं

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात गुन्हेगारांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच हत्या, यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर येत योग्य सुचना दिल्या होत्या. अशातच एका कार्यक्रमात त्यांनी गुन्हेगारी विश्वाला आळा घालण्यासाठी सज्जड दम देत, गुंडांना इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com