Hotel Taj: महाराष्ट्रात आणखी एक उभा राहणार ताज; मुख्यमंत्र्यांनी विनंती करताच एका मिनिटात केली घोषणा

Taj Hotel In Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेल असावे अशी इच्छा व्यक्त करताच ताज ग्रुपने लगेचच नागपुरात नवीन हॉटेल उभारण्याची घोषणा केलीय. तसेच नागपूर शहरात दुसरे जिंजर हॉटेलही उभारले जाणार आहे.
Taj Hotel
Taj Hotel In NagpurGoogle
Published On

मुंबई म्हटलं की, लगेच आपल्या डोळ्यासमोर इंडिया गेट आणि ताज हॉटेल येत असते. मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यात ताज हॉटेलचा मोठा वाटा आहे. आता महाराष्ट्रात अजून नवीन ताज हॉटेल उभारलं जाणार आहे. हे नवीन ताज हॉटेल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत ताज ग्रुपने हॉटेल उभारण्याची घोषणा केलीय.

Taj Hotel
PMRDA: पुणेकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार! PMRDA च्या १३३७ घरांची लॉटरी आज निघणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेलची निर्मिती झाली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषण होताच ताज ग्रुपने मिनिटातच नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे आता नागपूरकरांना लवकरच ताजमध्ये जाण्याचा योग येणार आहे.

Taj Hotel
KDMC Ring Road: केडीएमसीच्या रिंगरोडचा मार्ग मोकळा; एकाच गावातील 113 घरांच्या पाडकामाला सुरुवात

मुंबईतील वांद्रे येथे ताज ग्रुपकडून एका हॉटेलची उभारणी होतेय. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातही ताज हॉटेल असावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ताज ग्रुपने हॉटेल उभारणीची घोषणा केली. दरम्यान नागपूरमध्ये एक जिंजर हॉटेल आहे, त्यात आणखी एका हॉटेलची भर पडणार आहे.

Taj Hotel
Mumbai Local: मुंबईकरांना मिळणार नवी लोकल; डब्यांमधील प्रवाशांची रेटारेटी होणार कमी, जाणून घ्या कसा असेल नवा लूक

काय म्हणाले फडणवीस

वांद्रे परिसरात सुंदर हॉटेलची उभारणी केली जात आहे. त्याबद्दल मी इंडियन हॉटेलचे आभार मानतो. हे हॉटेल रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे होतं. हॉटेल उभारणीत काही अडचणी येत असल्याचं त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. या हॉटेलच्या प्लानिंग आणि डिझाईनमुळे मुंबईच्या सुंदरतेत आणखी भर पडेल. ताज ग्रुपच महाराष्ट्रात चांगलं मोठं स्थान आहे.

पण ताज ग्रुपचं नागपुरात हॉटेल नाहीये. ताज ग्रुपने नागपुरात हॉटेल उभारलं पाहिजे. तुम्ही आजच याबाबतची घोषणा करावी, अशी माझी इच्छा आहे, असं मुख्यमंत्री र फडणवीस म्हणाले. त्यानंतर त्यांचे भाषण संपल्यानंतर ताज ग्रुपकडून त्याबाबत घोषणा करण्यात आली.

दरम्यान वांद्रेमध्ये उभारण्यात येणाऱ्या हॉटेलविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 21 व्या शतकातील मॉन्यूमेंट म्हणून या हॉटेलकडे पाहिलं जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यींनी व्यक्त केला. हॉस्पिटॅलिटीची व्याख्या बदलली आहे. अनेक देशात ताज ग्रुपचं प्रस्थ आहे. त्यामुळे परदेशातही आपण मुंबई किंवा भारतातच आहोत, असं वाटतं, असं फडणवीस म्हणाले.

रतन टाटा यांच्या जाण्याआधी हे हॉटेल उभं राहिलं असतं किंवा भूमिपूजन झालं असतं तर त्यांना आनंद झाला असता. कदाचित आम्हीही त्यातील समस्या सोडवण्यात कमी पडलो. प्रकल्प उभारणी संदर्भात काही अडचणी आल्या तर आम्ही पाठीमागे उभं राहू, मुंबईला आणखी अशा हॉटेलची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com