Mumbai Local: मुंबईकरांना मिळणार नवी लोकल; डब्यांमधील प्रवाशांची रेटारेटी होणार कमी, जाणून घ्या कसा असेल नवा लूक

Mumbai Local Train: लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गोष्टीची दखल घेत रेल्वे प्रशासन नवीन डिझाइनच्या लोकल आणणार आहेत. या लोकलमध्ये व्हेंटिलेशन प्रणाली अपडेट केली जाईल.
Mumbai Local
Mumbai Local TrainSaam Tv
Published On

मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल आता नवं रुपात रुळावरून धावणार आहे. या नव्या लोकलमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. लोकलमध्ये प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आलेत. आता परत लोकलचे डिझाइन बदलण्यात येणार आहे. इतकेच नाही तर लोकल धावण्याचा वेळेत बदल केले जाणार आहेत. लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत मोठे बदल दिसून येतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केलाय.

Mumbai Local
प्रवाशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आंगणेवाडी यात्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी ४ विशेष गाड्या; वाचा सविस्तर

लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. प्रवाशांनी तुडूंब भरलेल्या डब्यांमध्ये वाद होत असतात. कधी-कधी लोकलमध्ये प्रवाशांना उभं राहण्यास जागा नसते. या गोष्टीची दखल घेत रेल्वे प्रशासन लोकलची डिझाइन बदलणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलच्या डिझाइनमध्ये बदल केले जाणार आहेत. या नव्या लोकलच्या डब्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा मोठी असेल.

त्यामुळे लोकलच्या डब्यात प्रवाशांसाठी हवा खेळती राहील. नव्या डब्यांची रचना अधिक मोकळी असणार आहे. म्हणजेच सध्याच्या ईएमयू लोकलच्या तुलनेत नव्या डब्यामध्ये जास्त जागा असणार आहे. तसेच लोकल डब्यातील व्हेंटिलेशन प्रणाली अपडेट केली जाईल. रिअल टाइम पॅसेंजर सिस्टम, स्वयंचलित दरवाजा आणि सर्वोत्तम वेंटिलेशनची प्रणाली यावर काम केलं जात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी दोन गाड्यांच्या वेळचं अंतरही कमी कमी केलं जाणार आहे. सध्या दोन लोकल गाड्यांमधील अंतर १८० सेकंद इतकं असून ते कमी केलं जाणार आहे. अडीच मिनिटाला येणारी लोकल आता दोन मिनिटांवर आणण्यात येणार आहे. जर दोन गाड्यांमधील वेळ कमी झाला तर आपोआप लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणं शक्य होणार आहे. पिक अवर्समध्ये गर्दीचं नियोजन करणं सोपं होईल.

Mumbai Local
Mega Block : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक, कसं आहे वेळापत्रक? वाचा

हवेची गुणवत्ता आणि प्रवाशांचे आरोग्य सुधारण्यासाठी नवीन गाड्या VB (व्हेंटिलेशन बेस्ड) प्रणालीवर आधारित बनवल्या जातील. ज्यात अत्याधुनिक वेंटिलेशन सिस्टीम असणार आहे. जे बॅक्टेरिया-मुक्त ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी हवा फिल्टर करेल. डब्यातील व्हेंटिलेशन सिस्टममध्ये सुधारणा केल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. नव्या लोकलच्या डब्यांमध्ये ९९.९९% बॅक्टेरियामुक्त ऑक्सिजन प्रणाली वापरल्याने हवेतील दूषित घटक आणि बॅक्टेरिया कमी होतील अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com