Earthquake News: साखर झोपेत असताना हिंगोली- नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची घराबाहेर धाव; पाहा VIDEO

Nanded Hingoli Earthquake: नांदेड जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील ३ महिन्यातील हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे. सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Earthquake News: साखर झोपेत असताना हिंगोली- नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची घराबाहेर धाव; पाहा VIDEO
Earthquake NewsSaam Tv
Published On

नांदेड आणि हिंगोली भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये आज सकाळीच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील २ गावांना भूकंपाचे धक्के बसले. तर हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेडमध्ये ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नांदेडमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. मागील ३ महिन्यातील हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे. आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव आणि मनाठा या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी नोंद भारतीय भूकंप मापण केंद्रावर झाली आहे.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या सावरगाव हे या भूकंपाचे केंद्र बिंदू दाखवत आहे. या भूकंपाच्या धक्क्याने या परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. हे भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही जण साखर झोपेत असताना हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली.

Earthquake News: साखर झोपेत असताना हिंगोली- नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची घराबाहेर धाव; पाहा VIDEO
Nanded News : भावकीतील लोकांकडून मारण्याची धमकी, आरोपाचा व्हिडीओ करत तरुणाने आयुष्य संपवलं!

तर दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले. हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोलीच्या कळमनुरीसह औढा तालुक्यातील १५ गावांमध्ये भूकंपेचा धक्के बसले.

पिंपळदरी पांगरा शिंदे, बोल्डा, सिनगी, वापटी या गावांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे दरम्यान प्रशासनानं नागरिकांना घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. सध्या हिंगोलीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी देखील हिंगोलीमध्ये भूकंपाची अनेक वेळा नोंद झाली होती.

Earthquake News: साखर झोपेत असताना हिंगोली- नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांची घराबाहेर धाव; पाहा VIDEO
Hingoli News : हिंगोली-रिसोड राज्य मार्गावर भीषण अपघात; देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com