Hingoli Vidhan Sabha
Hingoli Vidhan SabhaSaam tv

Hingoli Vidhan Sabha : हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

HIngoli news : हिंगोली विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेले भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना २००९ मध्ये भाजपने पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली होती.
Published on

हिंगोली : भाजपकडून आज राज्यातील ९९ मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत हिंगोली विधानसभेसाठी विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपच्या काही नाराज पदाधिकारीकडून बंडखोरीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

हिंगोली (Hingoli) विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेले भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना २००९ मध्ये भाजपने पहिल्यांदा उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या उमेदवाराने पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या मुटकुळे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारत विजय मिळवला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा मुटकुळे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आणि आता पुन्हा एकदा भाजपने (Tanaji Mutkule) तानाजी मुटकुळे यांना हिंगोली विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.  

Hingoli Vidhan Sabha
Beed Crime : संतापजनक..चिमुकलीवर ३ नराधमांकडून अत्याचार; बीडच्या चौसाला येथील धक्कादायक घटना

रामदास पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष 

विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरण लक्षात घेता तानाजी मुटकुळे हेच उमेदवार योग्य असतील; यावर भाजप नेतृत्वाने शिक्कामोर्तब केल आहे. मात्र मुटकुळे यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपचे नेते व विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले रामदास पाटील आता यानंतर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com