Koyna Dam Earthquake: मोठी बातमी! कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का

Satara News: या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमिटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.
Koyna Dam
Koyna Damsaam tv

Koyna Dam Earthquake News:

साताऱ्यामधून (Satara) एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमिटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी (२८, जानेवारी) कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस 6 किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टिकरण धरण व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

दरम्यान, कोयना धरण परिसरात (Koyana Dam Area) वारंवार भूकंपाचे धक्के जानवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Koyna Dam
Pratapgad Fort : 'प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

का होतात भूकंप?

पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे एकमेकांवर आदळतात त्या भागाला भूकंपाचा धोका असतो. तसेच जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भूकंपाचा धक्का बसतो. प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे पृथ्वीचा वरचा भाग हादरु लागतो. (Latest Marathi News)

Koyna Dam
Devendra Fadnavis: ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही; आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची महत्वाची प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com