Earthquake
EarthquakeSaam Tv

China Earthquake News : चीन सलग दुसऱ्या दिवशी शक्तीशाली भूकंपाने हादरला, भल्या पहाटे नागरिकांची पळापळ

China Earthquake News : चीनमध्ये ४८ तासांत दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. बुधवारी पहाटे पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने लोक भयभीत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू चीन-नेपाळ सीमेवर होता.
Published on

Earthquake News :

चीनमध्ये बुधवारी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. किर्गिस्तान-झिनजियांग सीमेजवळ हा भूकंप झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी मोजण्यात आली आहे.

याआधी मंगळवारी चीनमध्ये भूकंप झाला होता. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 मोजली गेली. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली. याशिवाय काही नागरिकांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) च्या मते, बुधवारच्या भूकंपामुळे जमिनीत 10 किलोमीटर खोल खड्डा पडला. चीनमध्ये ४८ तासांत दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. बुधवारी पहाटे पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने लोक भयभीत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू चीन-नेपाळ सीमेवर होता. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर अंदाजे 7.2 मोजली गेली.  (Marathi Latest News)

Earthquake
Zombie Virus News: झोम्बी व्हायरस कोरोनापेक्षाही खतरनाक! नव्या महामारीचं संकट, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

भूकंपानंतर लोकांनी घराबाहेर पडावे. किर्गिस्तान-झिनजियांग सीमा भागात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथकाच्या वाहनांचे सायरन सर्वत्र ऐकू येत होते. सध्या स्थानिक नागरी संस्था भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीची माहिती घेतली जात आहे.

Earthquake
Republic Day Special: शत्रूला भनकही न लागता 'टायगर शार्क' करणार काम तमाम; 26 जानेवारीला दाखवणार ताकद, मुंबईचं आहे कनेक्शन

भूकंप झाल्यास काय करावे?

मिळालेल्या माहितीनुसार, रिअॅक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा इमारतींचे नुकसान होते. त्यामुळे कमकुवत इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हाही भूकंप होतो तेव्हा घराबाहेर पडावे. कोणतीही इमारत, विद्युत खांब, झाड इत्यादींचा आसरा घेऊ नका, त्यांच्यापासून दूर राहा. तज्ज्ञांच्या मते, भूकंप झाल्यावर नेहमी मोकळ्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत जा आणि हादरे संपेपर्यंत तिथेच थांबा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com