अमित शाहांसोबतही खरातच फोटो; मग कारवाई फक्त एकावर का? थेट सवाल करत नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

Ashok Kharat Row: नाना पटोलेंनी खरात प्रकरणावर सरकारला घेरत निवडक कारवाईचा आरोप केला आहे. अमित शहांसोबतचे फोटो समोर असताना फक्त एकावरच कारवाई का, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून SIT स्थापनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
Nana Patole questions the Maharashtra government over alleged selective action in the Ashok Kharat case, raising concerns about political links and SIT probe.
Nana Patole questions the Maharashtra government over alleged selective action in the Ashok Kharat case, raising concerns about political links and SIT probe.Saam Tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडारा: रूपाली चाकणकर एक महिला असल्याने तिला टार्गेट केल्या जात आहे का? अशोक खरातसोबत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई होणार का? असा प्रश्न कॉँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. मंत्रीच नाहीतर खरातच्या प्रकरणामध्ये मंत्रालयातील अनेक अधिकारी सुद्धा सहभागी असल्याचा गौप्यस्पोट नाना पटोले यांनी केलाय. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी नाशिकचाच मुद्दा घेतला होता. आता खरात कोण आहे, ते समोर आलं.

Nana Patole questions the Maharashtra government over alleged selective action in the Ashok Kharat case, raising concerns about political links and SIT probe.
Asish Shelar News | ओबीसींना आरक्षण न देता निवडणूका हव्या आहेत का? शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असताना त्यांनी सांगितली होती, अशी कुठलीही घटना घडली नाही. खराच नव्हे तर, नाशिकमध्ये आणखी एक आहे ज्यामध्ये काही अधिकारी, मंत्री सुद्धा सहभागी आहेत. ज्या नाशिकमध्ये महाकुंभ होत आहे. तिथं अशी घटना घडते आणि यात महाराष्ट्र बदनाम होतोय. मागच्या वेळेस मी विधानसभेत पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, तो मुख्यमंत्र्यांनी का लपवला?? प्रकरण तेव्हाच उघडकीस आले असते. या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी तीन दिवसातच SIT स्थापन केली. SIT ची मागणी कुणीही केलेली नसताना राज्य सरकारने SIT स्थापन का केली?

Nana Patole questions the Maharashtra government over alleged selective action in the Ashok Kharat case, raising concerns about political links and SIT probe.
Sangli Crime: शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या, अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने वार करत संपवलं

या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आम्ही उद्या विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणून राज्य सरकारला खुलासा मागणार आहोत. वेळ आली तर सरकारला या प्रकरणात राजीनामा सुद्धा द्यावा, लागेल असा थेट इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

Nana Patole questions the Maharashtra government over alleged selective action in the Ashok Kharat case, raising concerns about political links and SIT probe.
Ashok Kharat Case: खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला, आमच्याकडे सर्व पुरावे, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

खरात प्रकरण अतिशय संवेदनशील....दोषींवर निश्चितच कारवाई होणार- पंकज भोयर

दरम्यान प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता प्रकरण महिलांच्या संदर्भातील असल्याने प्रकरण संवेदनशील आहे. म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी एका IPS महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SITC ची स्थापना करण्यात आली आहे. चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल. अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो जे दोषी असतील त्या सर्वांवर कायद्याच्या प्रोव्हिजनुसार कारवाई करण्यात येईल. अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com